(फोटो : माणगांव नगरपंचायत मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना प्रभाग क्र. १२ मधिल नागरीसमस्यांबाबत लेखी निवेदन देताना शिवसैनिक मयुरा तार्लेकर, शिवसेना शहरप्रमुख अजित तार्लेकर, नगरसेवक नितिन बामुगडे, सचिन बोंबले, कपिल गायकवाड, अजिंकेश जाधव, सुनील पवार, अनिल सोनार हे उपस्थित होते.)
माणगांव | राम सिताराम भोस्तेकर
माणगांव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ बामणोली रोड येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यां बाबत माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना येथिल सामाजिक कार्यकर्त्या कट्टर शिवसैनिक मयुरा अजित तार्लेकर यांनी लेखी निवेदन दिले आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अजित चं. तार्लेकर तसेच शिवसेना नगरसेवक सचिन बोंबले, नितीन बामुगडे, कपिल गायकवाड, अजिंकेश जाधव, सुनील पवार, अनिल सोनार हे उपस्थित होते.
नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ बामणोली रोड येथील संदेश राणे यांचे घराशेजारी नळपाईपलाईन फुटल्याने या ठिकाणी पिण्याचे पाणी मोठ्याप्रमाणात वाया जात असुन पुढील नळ कनेक्शन धारकांना पाणी पूरवठा होण्यास अडथळा येत आहे. तसेच येथिल डाॅक्टर कामेरकर हाॅस्पीटलचे बाहेर बाजुला असणारे नळ जोडणीचे कामही वारंवार दुरुस्ती करुनही नादूरुस्तच आहे. त्यामुळे या ठिकाणी गढुळपाणी येत आहे. ज्यामुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच येथील वामन विध्दांस यांचे घरासमोर पाईप लाईनचे काम करताना संबंधितांकडून जो खड्डा खोदण्यात आला होता, तो न बुजवल्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
अशा प्रकारच्या या प्रभागातील काही नागरी समस्या दुर्लक्षीत असुन येथिल सामाजिक कार्यकर्त्या तथा कट्टर शिवसैनिक महिला मयुरा तार्लेकर यांनी याबाबत लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांचे निदर्शनात आणल्या आहेत. याची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष परिस्थितीची चौकशी करुन योग्यती कार्यवाही करण्याचे आश्वसान मुख्याधिकारी यांनी दिले आहे.
إرسال تعليق