संत सेवालाल महाराज हे सर्व अठरापगड जातींचे संत!!
सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांची २८२ वी जयंती माणगावमध्ये उत्साहात साजरी
माणगांव राम भोस्तेकर
संपुर्ण महाराष्ट्रात अतिश्रम,काबाडकष्टाची कामे करून उदरनिर्वाह करणारा गोरबंजारा समाज महाराष्ट्रासह बेळगाव, कर्नाटक राज्यातून सहकुटुंब महाराष्ट्रात स्थलांतरित होत असतो. माणगांव शहरातील गोरबंजारा समाज सामाजिक मंडळ यांच्यावतीने समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांची प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. या कार्यक्रमामध्ये माणगांव तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजाविणारे मान्यवर व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेले विध्यार्थी यांचा गौरव करण्यात येतो.या वर्षी देखील समाजाचे माणगांव तालुकाध्यक्ष पुन्नु राठाेड यांच्या एकता नगर येथील निवासस्थानी संत सेवालाल जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माणगांवचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले व या नंतर राजकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल मा.नगराध्यक्ष आनंद यादव,उपनगराध्यक्ष दिलीप(बबडी)जाधव,माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे ,चेतन गावणकर,सुमित काळे यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर,शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिनेश महाडीक,तुषार बगडे, रविंद्र माेरे,व राठाेड सर यांना गाैरविण्यात आले व सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल रायगड जिल्हा नाभिक समाज उपाध्यक्ष महेंद्र जाधव, विधी व न्याय स्वंयसेवक प्रसाद जाधव व जेष्ठ समाजसेवक मेघाशेठ मुद्राळे यांना गाैरविण्यात आले तर प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी बद्दल नायब तहसिलदार म्हसळा किसन भिंगारे, संजय ठाकर,निलेश गावणकर यांना सन्मानित करण्यात आले तर प्रसारमाध्यम क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी बाबत माणगांव दै नवराष्ट्र चे पत्रकार प्रमाेद जाधव यांना गाैरविण्यात आले.
संत सेवालाल महारांजाचे सामाजिक कार्याबद्दल समाज बांधवाना संबाेधित करताना राठाेड सर यांनी सांगितले की,फक्त स्वत:च्या समाजापुरतेच मर्यादीत न रहाता संत सेवालाल महाराजांनी कार्य केले 17 व्या शतकापासुन आज पर्यंत गाेरबंजारा समाज अश्या महान संताची जयंती साजरा करत आला आहे आणि आजची 282 वी जयंती साजरी हाेत आहे,या प्रकर्षाने सांगताना सेवालाल महाराजांचे त्या काळात काेकणाशी संबंध फार चांगले हाेते त्याकाळात बाराबलुतेदारी व वस्तुरुप देवाण घेवाण पध्दती सुरु असता सेवालाल महारांजाकडुन काेकणातील मीठागरातुन मीठ नेऊन त्याबदल्यात धान्याची परतफेड हाेत हाेती,गाेरबंजारा समाज हा पुर्वीपासुन भटकंती व तांड्याने राहणारा समाज असल्याने संत सेवालाल महाराजांचे वडील त्या काळात 700 तांड्याचे प्रमुख नायक (मुकादम) हाेते,सेवालाल महाजांना माेतीवालाे,गादीवालाे,धाेळीघाेडीवाले या प्रमुख नावाने त्याकाळी आेळखले जायचे अश्या महान संताचा आदर्श डाेळ्यासमाेर ठेऊन प्रत्येक समाजबांधवाने कार्य करावे असे राठाेड सर यांनी आपल्या मनाेगतात व्यक्त केले.
काेराेना महामारी असाे किंवा निसर्ग चक्रीवादळ असाे या काळात समाजाचा एक प्रतिनिधी म्हणुन शासनाने वेळाेवेळी उंबरठे झिजवुन आवश्यक असणारी मदत प्रत्येक समाजघटकांपर्यत पाेहचविण्याचे काम मी माझ्या कुटुंबीयांनी केले आहे,व आमचा समाज हा काही प्रमाणात अल्पशिक्षित व अशिक्षित देखील आहे सामाजिक विचारांची देवाण-घेवाण व सुख: दुख: एकमेकांना कळावित या करीता सेवालाल जयंतीचे आैचित्य साधुन आमच्या कडुन असे समाजपयाेगी कार्यक्रम घेतले जात असतात.असे उद्गार गाेरबंजारा समाजाचे तालुकाध्यक्ष पुन्नु राठाेड यांनी काढले, माणगांव,तऴा,राेहाम्हसळा तालुक्यातील शेकडाे गाेरबंजारा समाजबांधवानी या कार्यक्रमास उपस्थिती दाखविली व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुषार बगडे सर यांनी केले,महाप्रसाद व स्नेहभाेजनाने कार्यक्रमाचा शेवट आभारप्रदर्शनाने करण्यात आला.
إرسال تعليق