म्हसळा पंचायत समिती नुतन इमारतीचे नामकरण आणि वसंतराव नाईक महाविद्यालयात विज्ञान शाखेचा उदघाटन राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते संपन्न होणार


म्हसळा पंचायत समिती नुतन इमारतीचे नामकरण आणि वसंतराव नाईक महाविद्यालयात विज्ञान शाखेचा उदघाटन राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते संपन्न होणार


म्हसळा - वार्ताहर

म्हसळा पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा तालुका आंबेत निवासी माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅ.ए.आर.अंतुले यांच्या स्मृतींची आठवण म्हणुन म्हसळा पंचायत समितीचे भवनास अंतुले साहेबांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती सदरची मागणी राज्य शासनाने अवघ्या आठच दिवसात मंजुर केली.नामकरण उदघाटन सोहळा,माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री,राष्ट्रीय नेते शरद चंद्रजी पवार यांचे हस्ते करण्याचे करण्याचे खासदार तटकरे यांचे मानस असल्याने दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी अवघ्या एका महिन्याच्या कालावधीतच नामकरण सोहळा करण्याचा सुवर्ण योग जुळून आला आहे.तसेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन,माणगाव आणि म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी 1990 मध्ये माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुले यांनी कळा आणि वाणिज्य कॉलेजची स्थापणा केली आता या विद्यालयात नव्याने विज्ञान शाखेला मान्यता प्राप्त केल्याने या विज्ञान शाखेचे उदघाटन याच वेळी राष्ट्रीय नेते,खासदार शरद चंद्रजी पवार यांचे हस्ते दुपारी 1.30 वाजता संपन्न होणार असल्याचे जाहीर निमंत्रण विश्वस्त अध्यक्ष मुस्ताक अंतुले,विश्वस्त सचिव अशोक तळवटकर यांनी दिले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा