माणगाव : राम भोस्तेकर
माणगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण ओळखल्या जाणाऱ्या पन्हळघर खुर्द ग्रामपंचायती चे उपसरपंच काशिराम वाडकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदा साठी निवडणूक दि.18 फेब्रुवारी २०२१ रोजी उत्साहात व शांततेत पार पडली. असून सरपंच सुजिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली व मा.सरपंच पंढरी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी अनिल चेरफळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. सकाळी ११ ते १२ यावेळेत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज पीठासन अधिकारी आदेश नथुराम तेटगुरे यांच्याकडे दाखल करण्यात आले होते.उपसरपंच पदासाठी अनिल चेरफळे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते.तर उपसरपंचपदी अनिल शिवराम चेरफळे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल असल्याने ते उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणुकीचे पीठासन अधिकारी आदेश तेटगुरे यांनी जाहीर केले.
यानंतर नवनिर्वाचित उपसरपंच अनिल शिवराम चेरफळे यांचे मा.सरपंच शिवसेना उपतालुकाप्रमुख पंढरी शेडगे , सरपंच सुजिता जाधव,मा.सरपंच दिक्षा दिपक करकरे,मा.उपसरपंच काशिराम वाडकर,मा.सुरेश मनवे, ग्रामपंचायत सदस्य समिधा समाधान करकरे,अनिषा अनिल महाडिक, दिपक बाळू करकरे, आझाद हिंद सेना जिल्हा अध्यक्ष रामचंद्र झोरे,संतोष नारायण जाधव,दिलीप बाळू करकरे, मारूती ल.करकरे, दत्तात्रेय मारुती करकरे, राजेंद्र गणपत शिंदे, ग्रामसेवक आदेश नथुराम तेटगुरे, डाटा आपरेटर सुचिता मालोरे, ग्रामपंचायत कर्मचारी दिपक करकरे यांच्यासह ग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांतील ग्रामस्थानी व मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق