श्री प्रकाश म्हात्रे (गुरूजी) स्वामी स्वरूपानंद आध्यात्म सेवा स्मृती पुरस्काराने सन्मानित



टीम म्हसळा लाईव्ह

मराठी तसेच संस्कृत भाषेवर  प्रभुत्व असलेले महाराष्ट्राचे आदर्श शिक्षक श्री प्रकाश जी जनार्दन म्हात्रे (गुरूजी) यांच्या अध्यात्मिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन स्वामी स्वरूपानंद आध्यात्म सेवा स्मृती लोक हिंद गौरव पुरस्कार २०२१ ने श्री प्रकाश जी जनार्दन म्हात्रे (गुरूजी) व त्यांचा पत्नी सौ कल्पनाताई यांना माननीय आमदार श्री पांडुरंग  बरोरा (शाहपुर) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रस्तुत सोहळा दिनांक २७ फेब्रुवारी रोजी शहापूर येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास शहापूर चे माजी आमदार श्री पांडुरंग  बरोरा, लोक हिंद चे संपादक महेश धानके, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष किसन बोद्रे, सह संपादक जगदीश पताळे आणि मान्यवर उपस्थित होते.

आदरणीय प्रकाश म्हात्रे जी गेली कित्येक वर्षे आध्यत्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच सध्या ते संत निरंकारी मिशनचे प्रचारक व रायगड झोन 40 A चे झोनल प्रमुख आहेत. त्यांच्या अध्यात्मिक कार्याची दखल अनेक सामाजिक संस्थांनी घेतली आहे. आदर्श शिक्षक, विद्या भूषण, समाज भूषण तसेच २०१६ साली त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या "धर्मरत्न" अशा एक ना अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा