(म्हसळा -वार्ताहर)
हिंदी,मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज म्हसळाच्या आदर्श शिक्षिका प्रा.श्रीमती रिजवाना आसिफ सय्यद यांनी राष्ट्रभाषा हिंदी चा प्रचार आणि संवर्धन करणे राष्ट्रीय कार्यात चांगले योगदान दिले बद्दल त्यांना या वर्षाचा गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत "महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श हिंदी प्रचारक भाषा रत्न पुरस्कार" प्राप्त झाला आहे.दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मिरामार पणजी येथील हॉटेल सोलमार सभागृहात माजी केंद्रीय कायदा मंत्री तथा गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री ऍड रमाकांत खलप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या आदर्श हिंदी प्रचारक संमेलनात गोवा राज्याचे कला,सांस्कृतिक व आदिवासी कल्याण मंत्री ना.गोविंद गावडे यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका प्रा.रिजवाना सय्यद यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवुन सत्कार करण्यात आला.आयोजित सत्कार कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री रवि नाईक,संमेलनाध्यक्ष तथा हिंदी दैनिक नित्य समयचे संपादक प्रभाकर ढगे,एस.पी.कॉर्पोरेशनचे चेअरमन तथा माजी कृषी,क्रीडा मंत्री रमेश तवडकर,गोवा औद्योगिक महामंडळाचे माजी व्यवस्थापक विजयकुमार,गोवा प्रेसक्लब सचिव अनंत जोशी, गुजरात बिजु उद्योग समुहाचे बिजुभाई आदी मान्यवर उपस्थित होते.या संमेलनात रायगड जिल्ह्यातील अंजुमान हायस्कूलच्या शिक्षिका प्रा.रिजवाना आसिफ सय्यद यांचे सह मुरुड येथील व्हेंचर फाउंडेशन महाराष्ट्र महासचिव तुफैल दामाद,सईदा कारभारी,महाड येथील राज्य सहाय्यक संयोजक राजुदास पवार,अलिबाग येथील जिल्हा प्रतिनिधी गीता पाटील आणि सुनिल पाटील या सहा जणांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते 2021मधील गोवा हिंदी अकादमी भाषारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.भाषा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या श्रीमती प्रा.रिजवाना सय्यद यांचे म्हसळा तालुक्यात सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
إرسال تعليق