दिघी सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी संदीप पोमान


टीम म्हसळा लाईव्ह 

दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी संदीप पोमान यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. दिघी सागरीचे मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना मीरा - भाईंदर - वसई- विरार पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली असून महेंद्र शेलार यांनी संदीप पोमान यांना दिघी सागरी पोलीस ठाण्याचा शुक्रवारी पदभार सुपूर्द केला. दिघी सागरी पोलीस ठाण्यात नव्याने पदभार स्वीकारलेले सपोनि संदीप पोमान हे यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग येथे कार्यरत होते . अलिबाग येथे असताना त्यांनी अनेक गुन्ह्यांची यशस्वीरीत्या उकल केली आहे . शिस्तबद्धता आणि कर्तव्यदक्षता यामुळे त्यांनी अनेक गुन्हेगारांवर आपली जरब निर्माण केली . त्यामुळे दिघी सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर परिसरात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहील व गुन्हेगारी प्रवृत्ती तोंड वर काढणार नाही तसेच अनधिकृत व अवैध धंद्यांना कायमचा आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे . 

परिसरात शांततापूर्ण वातावरण अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीला कसा आळा बसवता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाईल . नागरिकांना कोणतीही अडचण किंवा काहीही तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. संदीप पोमान ( सपोनि दिघी सागरी पोलीस ठाणे ) 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा