अवैद्य पार्किंग मुळे तळा बाजारपेठेत वाहतूक कोंडी : समस्या जैसे थे..प्रशासनाचे दुर्लक्ष


तळा (किशोर पितळे) तळा बाजारपेठेत दिवसेंदिवस अवैद्य पार्किंग मुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. बाजारपेठेत खाजगी वाहनांच्या पार्किंग मुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.मात्र याकडे तळा नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे पहायला मिळत आहे. तळा शहरातील बाजारपेठ ही अगदी लहान असून बाजारात येणारे नागरिक आपली दुचाकी व चारचाकी कोठेही पार्क करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.दर बुधवारी भरणारा आठवडा बाजार  हा बसस्थानक शेजारी असल्याने तालुक्याबाहेरील वाहने बसस्थानकात लावली जातात.यामुळे एस टी लावण्यास चालकाला अडचण निर्माण होते त्यामुळे चालक एस टी बाहेरच लावत असल्याने परिणामी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते.त्यामुळे नगरपंचायतीने आशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. तरी प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा