तळा (किशोर पितळे)
तळा नगरपंचायत होऊन पाच वर्षाचा कालावघी लोटला आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या दूर झालेली नाही.त्यामुळे मोठ्या प्रश्न निर्माण झाला आहे.पोलीस खात्याकडे ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ किंवा टोनिंग वाहन व्यवस्था उपलब्ध नाही शहरात मोठ्या प्रमाणावर नागरीकांची वाढती वर्दळ होत असते.तालुका ठिकाणी अनेक जण बाजार खरेदी साठी किंवा इतर कामासाठी येत असतात त्यामुळे खाजगी वाहनाचा सुळसुळाट होत आहे. ग्रामीण भागातून सरकारी कामासाठी बाहेरून जनता येत असते तर काही पर्यटक,शासकीय अधिकारी काँलेजचे विद्यार्थी, सामान्य नागरिक आपली वाहने कशी पण कोठेही पार्क करुन जात आहेत तर काहीच्या दुकाना समोर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत उभी केलेली असतात. त्यामुळे भर शहरात एस्.टि स्टँड आवार व परिसर,बळीचा नाका, रिक्षा स्टँड परिसर,अशा विविध ठिकाणी तसेच रस्त्याच्या दुतर्फा वर मोटार सायकली वाहने मोठ्या गाड्या यामुळे विषेशतः वाहतूक कोंडी होत असताना दिसत आहे. नगरपंचायत प्रशासन या बाबत ठोस कारवाईचा बडगा उचलताना दिसून येत नाही याबाबत यापूर्वी अनेक वेळा लेखी, ता.स.समीती मिटींग,वृतपत्राचे माध्यमातून या गंभीर समस्या दृष्टीक्षेपात आणूनदिल्या आहेत पण काहीसुधारणा झालेली नाही.तरी नगरपंचायतीने पार्किंगव्यवस्था करून पे.अँन्ड पार्किंग व्यवस्था केली तर आर्थिक उत्पन्नातनिश्चित वाढ होईल व अतिक्रमणे आणी मुजोरी कमी होईल वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होईल.तरी नगरपंचायतीने हि गंभीर समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.
إرسال تعليق