जनकल्याण समितीच्या नावातच जनसेवा आहे - नगराध्यक्षा जयश्री कापरे


म्हसळा - प्रतिनिधी


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत)मार्फत म्हसळा सार्वजनिक वाचनालयात सोमवार दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी रुग्णोपयोगी साहित्य पुरविणे केंद्राचे उदघाटन म्हसळा नगरपंचायतिच्या नगराध्यक्षा जयश्री कापरे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी त्यांनी अध्यक्षस्थानी मनोगत व्यक्त करताना म्हसळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला प्रथमच जनकल्याण समितीच्या माध्यमातून आवश्यक रुग्णोपयोगी साहित्य सेवा उपलब्ध झाली आहे या कामी सार्वजनिक वाचनालयाने मोलाचा सहभाग घेतला आहे.हे स्तुत्य उपक्रम खरोखरच लोकोपयोगी व कौतुकास्पद आसुन जनकल्याण समितीचे नावातच जनसेवा असल्याने समितीचे संयोजकाना सेवेसाठी धन्यवाद दिले.गरजु आणि गोरगरीब रूग्णांना रुग्णोपयोगी साहित्य पुरविणे केंद्राचे उदघाटन कार्यक्रमाला अध्यक्षा जयश्री कापरे,प्रमुख अतिथी कोकण प्रांत कोषाध्यक्ष श्रीनिवास भाटे,रायगड जिल्हा कार्यवाह पुरुषोत्तम कुंटे, वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,रा.स्व.संघ म्हसळा कार्यवाह यतीन करडे,माजी सभापती महादेव पाटील,जर्मादन कांबळी,रायगड कोषाध्यक्ष श्रीपाद गिरीधर,विष्णु जोशी,उदय जोशी,रुग्ण सेवा प्रमुख हेमंत ओक, शिक्षण आयाम आरती देशमुख,बीजेपी तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर,माजी अध्यक्ष शैलेशकुमार पटेल,प्रेस क्लब अध्यक्ष बाबु शिर्के,म्हसळा टाइम्स संपादक रमेश पोटले,रायगड मत संपादक जितेंद्र नटे,वाचनालय उपाध्यक्षा अपर्णा ओक, संचालिका रेखा धारिया,उमा जोशी,दैवज्ञ समाज अध्यक्ष सुनिल उमरोटकर,व्यापारी संघटना अध्यक्ष नंदकुमार सावंत,दुर्जनसिंह राठोड,ईनुसशेट मेमन,नारायणशेट राजपुत, बीजेपी शहर अध्यक्ष संतोष पानसरे,माजी अध्यक्ष मंगेश मुंडे,समाजसेवक भालचंद्र करडे, बीजेपी जिल्हा चिटणीस सदस्य तुकाराम पाटील,श्री सुनिल विचारे,पांडुरंग पाटील,ग्रंथपाल उदय करडे,सायली चोगले आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.प्रमुख अतिथी श्रीनिवास भाटे यांनी जनकल्याण समितीची निर्मिती आणि कार्याची माहिती सांगताना कोकणातील म्हसळा तालुक्यातील हे 71 वे सेवा केंद्र सुरू झाले असल्याचे आनंद आहे.समिती देत असलेल्या सेवेत आपत्कालीन मदत,उच्च शिक्षण,आरोग्य सेवा,संस्कार,संस्कृती,युवक आणि युवतींना शैक्षणिक मार्गदर्शन शिबीर व कॉलेजची स्थापना,इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विध्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात आवड व्हावी म्हणुन शिक्षण देणे,निराधार मुलांसाठी आश्रम सुविधा,प्रांतीय शिक्षण,देश प्रेम आदी योजना राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे माध्यमांतून अनेक सेवा मोफत व माफक दरात देण्यात येत असल्याचे सांगितले.या वेळी माजी सभापती महादेव पाटील,सा.वा.अध्यक्ष संजय खांबेटे यांनी मनोगतात वरील चांगल्या उपक्रमाचे स्वागत करून धन्यवाद दिले आणि या सेवेत सक्रिय सहभाग घेवुन नेहमीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.रायगड जिल्हा कार्यवाह पुरुषोत्तम कुंटे यांनी प्रास्ताविकात सार्वजनिक वाचनालयाचे इमारतीत सुरू करण्यात आलेल्या केंद्रामधून रुग्णांना लागणाऱ्या आरोग्य विषयक वस्तू माफक भाडेतत्वाने पुरविण्यात येणार आहेत. जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या माध्यमातून राज्यात दुष्काळग्रस्तांना मदत, ग्रामीण भागात येणारी पाणीटंचाई,गुरांसाठी चारा छावण्या,पशुखाद्याचे वाटप,जल स्तोत्रांचे पुनरज्जीवन,निसर्ग चक्री वादळ ग्रस्तांना कोकण भागात करण्यात आलेली मदत,आदिवासी भागात घरकुले वाटप अशी बहुविध लोकोपयोगी कामे जनकल्याण समिती मार्फत करण्यात येतात.समितीचे कामाची दखल मराठी,हिंदी, इंग्रजी ई.वृत्तपत्रेही घेतात त्याच प्रमाणे आकाशवाणी दूरदर्शन आणि अन्य वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून लोकपयोगी कार्य-उपक्रमाचे कौतुक व प्रसिद्धी होत असते याच प्रकारे म्हसळा केंद्राचे माध्यमातून रुग्णांना आरोग्य विषयक साहित्य नाममात्र प्रती दिन भाडेशुल्क आकारून दिले जाणार आहे त्याचा गरजू रुग्ण व नातलगानी लाभ घ्यावा असे सांगितले.म्हसळयामधील केंद्रात गरजु रुग्णांना व्हीलचेयर,वॉटर बेड,एअर बेड, ट्रॅक्शन कीट, टॉयलेट चेअर, विविध साइजच्या कुबड्या, नेब्युलायझर इत्यादी साहित्य उपलब्ध होणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव अशोक काते यांनी तर स्वागत व आभार रेखा धारिया यांनी मानले.
फोटो : जनकल्याण समितीचे श्रीनिवास भाटे मनोगत व्यक्त करताना

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा