टीम म्हसळा लाईव्ह
महाराष्ट्र शासन व पशूसंवर्धन विभागाच्या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री पशूसंवर्धन योजनेतून माणगाव तालुक्यासाठी फिरता पशू वैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात आला असून याचा उद्घाटन आज गुरुवार, दि.25 फेब्रुवारी रोजी माणगाव प्रांत कार्यालय या ठिकाणी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी फिरत्या दवाखान्याच्या रुग्णवाहिकेची व त्यातील औषधांची पाहणी केली.
या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आरले, प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियांका आयरे-कांबळे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन माणगाव तालुका लघु पशू सर्व चिकित्सालय डॉ.डि.टी.खोत हे उपस्थित होते.
या फिरत्या दवाखान्यात आजारी पशू रुग्णांवर शेतकऱ्यांच्या दरात उपचाराची सुविधा, रोगप्रतिबंधक लसीकरण, उच्च उत्पादक क्षमता असणाऱ्या वळूंचा रे हमात्रा वापरून कृत्रिम रेतन, पशू आहार व आरोग्याबाबत तज्ज्ञ पशू वैद्यकामार्फत मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती इत्यादी सेवा व सुविधा उपलब्ध असणार आहेत.
या कार्यक्रमास करोना विषयक सर्व नियमांचे पालन करीत पशूधन विकास अधिकारी डॉ.धनंजय डुबल, पशूधन विकास अधिकारी डॉ.सतीश शहा आदींसह विविध खात्यांचे अधिकारी -कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
إرسال تعليق