जिल्ह्यात दि.01 ते दि.26 मार्च 2021 या कालावधीत फिरते लोक अदालत व कायदे विषयक शिबिराचे आयोजन


जिल्ह्यात दि.01 ते दि.26 मार्च 2021 या कालावधीत फिरते लोक अदालत व कायदे विषयक शिबिराचे आयोजन

 उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते होणार संपन्न

टीम म्हसळा लाईव्ह 
मा. उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या निर्देशानुसार सोमवार, दि. 01 मार्च ते दि.26 मार्च 2021 या कालावधीत जिल्ह्यात फिरते लोक अदालत व कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या फिरते लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ सोमवार, दि.01 मार्च 2021 रोजी सकाळी 10.30 वा. रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात रायगड-अलिबाग प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती विभा प्र.इंगळे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, सर्व न्यायिक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संदिप वि.स्वामी यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा