( म्हसळा प्रतिनिधी) प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमिक शाळा संदेरी शाळेच्या इमारतीचे भूमीपूजन समाजसेवक व रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्या शुभ हस्ते व प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अमित देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या भौतिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडीक यांच्या प्रयत्नातून शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी पाटोळे , सरपंच बबन खाडे ,भागोजी चीबडे, यशवंत गोरिवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाल्याने ग्रामस्थ , आजी माजी विद्यार्थी यांनी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडीक यांचे आभार व्यक्त केले आहेत.
फोटो इमारतीचे भूमिपूजन करताना मान्यवर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडीक आणिअन्य
إرسال تعليق