आर्थिक गुन्हे शाखा विभागातील पोलिस अधिकारी व नांदीवसेचे सुपुत्र महेंद्र शिंदे यांचे इम्रान कोंडकरी कुटुंबीयांकडून स्वागत


आर्थिक गुन्हे शाखा विभागातील पोलिस अधिकारी व नांदीवसेचे  सुपुत्र महेंद्र शिंदे यांचे इम्रान कोंडकरी कुटुंबीयांकडून चिपळुनात स्वागत

चिपळूण (ओंकार रेळेकर): तालुक्यातील दसपटी विभागातील नांदीवसेचे सुपुत्र व पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेले बेडर अधिकारी महेंद्र शिंदे यांनी नुकतीच मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रान कोंडकरी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.  यावेळी कोंडकरी कुटूंबियांनी श्री.  शिंदे यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर इम्रान कोंडकरी यांनी पोलीस अधिकारी महेंद्र शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
 नांदिवसे  गावाचे सुपुत्र असलेले महेंद्र शिंदे हे आर्थिक गून्हे शाखा, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९८ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन  पोलीस उप निरीक्षकपदी निवड होवून महाराष्र्ट पोलीस दलात सामील झाले.  २००५  ते २००७ या तीन वर्षांच्या कालावधीत गडचिरोली येथे सेवा बजावली. या काळात या ठिकाणी  ५ नक्षलवाद्यांचे एन्काऊंटर केले. तसेच ४२ भू-सुरुंग निकामी केले. या कामगिरीबद्दल व गडचिरोली येथील Tough Service करीता विशेष पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच  २००७  ते २०१४  दरम्यान ठाणे व डोंबिवली येथे तपासिक अधिकारी म्हणून उत्तम सेवा बजावली. यामुळे येथील बरेच गुन्हे उघडकीस आले.  यानंतर माळशेज व सिंधूदूर्ग येथे सेवा बजावताना  आपले कर्तव्य चोखपणे बजावले. आता २०१७ पासून मुंबई शहर पोलीस दलात कार्यरत आहेत.  
Economic Offence Wing येथे मूंबई शहरात होणारे सहा कोटी पेक्षा जास्त रकमेचे फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास केला आहे. एकंदरीत महेंद्र शिंदे यांनी पोलिस दलात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. चिपळुनात आपल्या कुटुंबीयांसमवेत आले होते. यावेळी मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रान कोंडकरी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.  कोंडकरी कुटुंबीयांनीदेखील श्री.  शिंदे यांच्या कुटुंबीयांचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मायभूमीत आदरयुक्त झालेले स्वागताने आपण भारावून गेलो आहोत, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकारी महेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा