म्हसळा शहरांत पास्को अंर्तगत गुन्ह्याची नोंद : आरोपी मोकाट



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा शहरांत नव्याने पास्को अंर्तगत गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचे सपोनी धनंजय पोरे यानी सांगितले. सदरचा गुन्हा ०/२०२० ने खडक जि.पुणे पोलीस स्टेशनवरून म्हसळा पोलीस स्टेशनला Transfer झाला असून म्हसळा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.५२ /२०२० भा.द.वि.३७६ ,५०७ बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायदा(पॉस्को) (४)(८) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.फिर्यादी व आरोपी दोघेही म्हसळा शहरांतील अन्य धर्मीय आहेत. तक्रारदार फिर्यादी व आरोपी यांच्यात मागील ३ वर्षापासून जवळचे संबध असून म्हसळा नवनागर,दिवेआगरबिच,पुणे व लोणावळा येथे त्यांचा एकत्रित संबंध आल्याचे पिडीत महीलेने आपल्या तक्रारीत म्हटल्याचे सपोनी पोरे यानी सांगितले, आरोपीने यावेळी लग्नाचे आमिष दाखविल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. सदरचे गुन्ह्यात अद्याप पर्यंत आरोपीला अटक झाली नसल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले, गुन्ह्याचा तपास स. पो.नी. धनंजय पोरे करीत आहेत.

"बाल हक्क संरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कराराच्या ११ डिसेंबर, १९९२ रोजीच्या अटींना भारत सरकारने मान्यता दिली आहे. त्याआधारे केंद्राने भारतासाठी २०१२ मध्ये बालक लैंगिक कृत्ये संरक्षण कायदा तयार केला आहे. त्यालाच ‘पोस्को’ कायदा असे म्हटले जाते. सदर गुन्ह्यात तपास यंत्रणेने गतीमान तपास करून जलद गतीचे न्यायालयांत गुन्हा चालवणे जरुरीचे असते लैंगिक कृत्याच्या गंभीरतेनुसार किमान तीन वर्षे, पाच वर्षे, दहा वर्षे अथवा जन्मठेप होण्याची कायद्यात तरतूद आहे."
कायदे विषयक अभ्यासक

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा