माणगांव नगरपंचायत निवडणुकीत भाजप 17 च्या 17 सर्व प्रभाग लढवणार.-शहराध्यक्ष राजु मुंडे.



राम भोस्तेकर माणगाव

येत्या काही महीन्यातच रायगड जिल्ह्यातील काही नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर हाेईल त्यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या माणगांव नगरपंचायतीचा समावेश आहे,माणगांव शहरातील नाक्यानाक्यावर या नगरपंचायत निवडणुकीची खुमासदार चर्चा सुरु आहे , यातच माणगांव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजु मुंडे यांनी स्पष्ट केले आहे की  देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी माेदी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव नगर पंचायतीत भाजप चा नगरसेवक बसावा आणि केंद्रीय याेजनांचा  स्थानिक स्वराज्य संस्थापर्यत पुरवठा व्हावा याकरीता माणगांव नगरपंचायत निवडणुकीत एकुण 17. पैकी 17 प्रभागामध्ये भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार देणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले साेबत च पक्षाचे तिकीट (A'B फाँर्म)वाटताना पक्षाचे विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांना संधी देण्याकरीता जिल्हाध्यक्ष अँड महेश माेहीते तालुकाध्यक्ष संजय (आप्पा)ढवळे व तालुका कार्यालयीन सरचिटणिस याेगेश सुळे,संघटन सरचिटणिस उमेश साटम यांच्याकडे मागणी प्रस्ताव ठेवला असल्याचे मुंडे यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले ,राज्यात महाविकास आघाडीचा विजयी रथ राेखण्यासाठी भाजप माणगांव नगरपंचायतीचे सर्वच प्रभाग लढवणार असल्याचे सुचक वक्तव्य माणगांव शहराध्क्ष राजु  मुंडे यांनी स्पष्ट केला आहे.. आणि माणगांव शहरातील नाशीवंत कचरा विघटन समस्या,अंतर्गत रस्तांची दुरावस्था,ड्रेनेज मँनेजमेंट हे मुद्दे प्रकर्षाने माणगांवकरांच्या समाेर ठेऊन माणगांव नगरपंचायत निवडणुक भाजप स्वबळावर लढेल आणि लवकरच आमच्या भाजप च्या काेअर कमिटीच्या सभेत आम्ही स्वबळाचा निर्णय पास करुन सर्व प्रभाग स्वबळावर लढवणार असल्याचे मुंडे यांनी बाेलताना सांगितले. भाजप माणगांव तालुक्याचे  सर्व सेल भाजयुमाे जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय माेने युवा माेर्चा अध्यक्ष गलांडे ,महीला माेर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे,व सर्व कमिट्या व सर्व सेल यांच्या सांयुक्तिक मिटींगमध्ये सर्व प्रभाग स्वबळावर लढवण्याचा मानस माणगांव शहर भाजप ने ठेवला आहे,

माणगांव नगरपंचायत निवडणुकीसाठी असणार्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तालुक्यातील इतर विभागांप्रमाणे भाजप निजामपुर विभाग ही सर्व नगरसेवक उमेदवारांच्या पाठीशी रहाणार.
श्री.गाेविंद कासार., भाजप निजामपुर विभागाध्यक्ष..
तथा सदस्य ग्रामपंचायत काेस्ते //खु//.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा