मा. श्री कृष्णा कोबनाक यांच्या हस्ते पाभरे पंचक्रोशी श्री काळभैरव हिंदु देवस्थान ट्रस्ट मंदिराचे वाॅल कंपा़ऊंड व सुशोभीकरण कामाचे भुमिपुजन


टीम म्हसळा लाईव्ह
रविवार दिनांक १८ आॅक्टोबर, २०२० रोजी  पाभरे पंचक्रोशी श्री काळभैरव हिंदु देवस्थान ट्रस्ट मंदिराचे वाॅल कंपा़ऊंड व सुशोभीकरण कामाचे भुमिपुजन मा. श्री कृष्णा कोबनाक महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जमलेल्या लोकांना सबोधित करताना श्री. कोबनाक म्हणाले की या पंचक्रोशीमधील प्रमुख कामे ही माझ्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली असून पाभरे पंचक्रोशीमध्ये होणाऱ्या विकास कामांमध्ये माझ योगदान मोठ्या प्रमाणात आहे. पाभरे मध्ये माझ्या खुप जुन्या आठवणी आहेत या भागात मि लहानाचा मोठा झालो आहे. पाभरे मंदिराच राहिलेले अर्धवट काम ही माझ्या हातुन लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन उपस्थितांना दिले. या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री प्रकाश रायकर, तालुका सरचिटणीस श्री. सुनील शिंदे, तालुका सरचिटणीस श्री.महेश पाटील, प्रभारी तालुका अध्यक्ष महिला मोर्चा सौ. सुनंदा पाटील, तालुका उपाध्यक्ष श्री. अनिल टिंगरे, तालुका उपाध्यक्ष श्री.लहू तुरे, तालुका उपाध्यक्ष श्री.समीर धनसे, तालुका चिटणीस मनोहर जाधव, तालुका उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ. रुपाली भायदे, तालुका उपाध्यक्ष युवा शरद कांबळे व अन्य पदाधिकारी  व पंचक्रोशीतील प्रमुख ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा