फोटो : विचारे फॅमीली रेस्टॉरंट
म्हसळा पोलीसांचा अजब कारभार दरोडेखोरी -घरफोडीची तक्रार करून : तब्बल पाच दिवस उलटले तरी गुन्ह्याची नोंद नाही.
संजय खांबेटे : म्हसळा
दरोडेखोरी -घरफोडी सारख्या गुन्हाचे गंभीर स्वरूप असुनही म्हसळा पोलीसानी साधी गुन्ह्याची नोंद सुद्धा केली नसल्याची घटना घडली शहरांत -तालुक्यांत एकच चर्चा सुरु झाली "म्हसळा पोलीसांवर विश्वास ठेवायचा का नाही?"
घटना क्रम असा की, म्हसळा -माणगाव - पुणे या राष्ट्रीय मार्गावर देवघर नजिक लॉक डाऊनमध्ये बंद असलेल्या विचारे फॅमीली रेस्टॉरंट वर दरोडेखोरानी शुक्रवार दि ९ ऑक्टो रोजी घरफोडी करून हॉटेल मधील रु ९० हजार किमतीचे दोन फ्रिज चोरल्याची घटना घडली.भाजपाचे तालुका चिटणीस व विचारे फॅमीली रेस्टॉरंटचे मालक सुनील विचारे यानी शनी दि.१० ऑक्टो रोजी सकाळी लक्षात आल्याबरोबर दरोडयाचे गांभीर्य समजून थेट म्हसळा पोलीस स्टेशन गाठून ठाणे अंमलदार किशोर जाधव याना घटनेचे गांभीर्य सांगून कथन केले. सॅमसंग कंपनीचा ४०० लीटरचा फ्रिज व Blue Star कंपनीचा ३०० लीटरचा कोल्ड स्टोअरेज दोन्ही मिळून रु ९० हजारचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला असे सांगितले. त्याच वेळी लेखी तक्रार दिली आञ तब्बल चार दिवस झाले तरी पोलीसांकडून दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद नोंदविल्यानंतर एफआयआरची एक प्रत विनाशुल्क फिर्यादीस देण्याच्या नियमाचे पालन झाले नाही याची सुनील विचारे यानी खंत व्यक्त केली . सदरची चोरी १० ऑक्टो रोजी रात्री १२ ते१.३० च्या दरम्यान झाली असावी, दरोडेखोर किमान ३ते ५ व्यक्ती असावे त्यानी प्रथम हॉटेलच्या हॉलमध्ये जाऊन किचन चे दरवाजा उकडून किचन मध्ये जाऊन किचनमध्ये असणारे दोन्ही फ्रिज पाठीमागचा दरवाजा उघडून टेंपो अगर पीक अप ने घेऊन गेले असावे असा अंदाज विचारे यानी वर्तविला.
"२१ मार्च २०२० पासून Covid 19 च्या अनुषंगाने हॉटेल व्यवसाय बंद आहे, एकीकडे ५ ते ६ लक्ष रुपयाचे कर्ज एप्रिल २० मध्ये सुमारे रु २० हजारच्या हॅलोजन दिव्यांची चोरी व या दरोडयामुळे कुटुंबावर आर्थिक ताण झाला आहे"
सुनील विचारे , हॉटेल मालक देवधर
"म्हसळा पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार सुर्यवंशी यांच्या जवळ गुन्हा नोंदविला का नाही याबाबत आजचौकशी केली असता विचारे फॅमीली रेस्टॉरंटमधील फ्रिज चोरीच्या गुन्ह्याची नोंद रेकॉर्डला दिसत नाही" असे सांगितले
"भारतीय दंड संहितेत अशा गुन्ह्यांचे घटक व त्यांबाबत प्रतिबंधात्मक व दंडात्मक अशा कायदेशीर उपाययोजनांची तरतूद केलेली आहे तरी म्हसळा पोलीसानी गुन्हाची नोंद का केली नाही ही गंभीर बाब आहे. म्हसळा पोलीस स्टेशन हद्दीत खरसई ११ घरफोडया (२०१६) म्हसळा शहरांत ६ घरफोडया ( २०१७) , म्हसळा नवा नगर २०१८, कोंझरी (२०१९) रणजीत जैन व अन्य (२०२०) या घरफोडयांची सुद्धा उकल अद्याप झाली नाही"
महादेव पाटील, तालुका प्रमुख शिवसेना
إرسال تعليق