18 ऑक्टोबरला रोहेकरांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे किशोर तावडे यांचे आवाहन



रोहा (निखिल दाते )
महाराष्ट्रात सध्या रक्ताची नितांत गरज आहे ही गरज लक्षात घेता रोह्याची मातृसंस्था असलेल्या भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे शारदोत्सवानिमित्त रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत जनकल्याण रक्तपेढि महाड यांच्या सौजन्याने भाटे वाचनालयाच्या भट सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, रोहेकरांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करुन या अडचणीच्या काळात आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन भाटे वाचनालय संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष किशोर तावडे यांनी केले आहे.
आजपर्यंत जेव्हाजेव्हा देशावर व राज्यावर कोणतेही संकट आले त्यावेळी रोहेकरांनी आपले दायित्व जपलेले असून प्रत्येकवेळी आपले योगदान दिले आहे तसेच या गरजेच्या वेळी देखील रोहेकरांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे व या चळवळीतील आपले योगदान नोंदवावे असे भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून भाटे सार्वजनिक वाचनालयाने रक्तदान शिबिराचे या गरजेच्या वेळी आयोजन करुन एक आदर्श घालून दिला असल्याची प्रतिक्रिया अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा