वडपाले येथे एकदिवसीय शेतकरी मार्गदर्शन शिबीर संपन्न


जमिनींचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी व पिकाच्या अधिक उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण गरजेचे -पडवळकर

राम भोस्तेकर माणगाव

रायगड जिल्ह्या माणगाव तालुक्यातील वडपाले या गावात आज दिनांक 9/10/2020 रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव यांच्या सौजन्याने मृदचाचणी व एकात्मिक खत व्यवस्थापन पध्दती या विषयावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना  मंडळ कृषि अधिकारी श्री पडवळकर यांनी एकात्मिक खत व्यवस्थापन पध्दती या विषयावर मार्गदर्शन केले तर मृदचाचणी या विषयावर कृषी पर्यवेक्षक श्री. ससाणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेती संबंधीत विवीध योजनेचे व शेती पुरक योजनां विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मंडळ कृषि अधिकारी पडवळकर, कृषी पर्यवेक्षक ससाने, कृषी विभागातील शिंदे, सुरडकर, राम कदम,  नलावडे, उगले, श्रीमती जगताप मॕडम तसेच वडपाले गावचे शेतकरी गणपत शिंदे, तानाजी शिंदे, गजानन शिंदे, बाबूराव शिंदे, अशोक शिंदे,अनंत शिंदे यांचेसह 50 ते 60 शेतकरी व महिला वर्ग  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक मयुर कोळी यांनी केले. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा