नवतरूण मित्र मंडळ रातिवणे मुंबई तर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह

म्हसळा   कोळवट पंचक्रोशीतील मौजे रातिवणे गावातील नवतरुण मित्र मंडळ मुंबई यांनी सध्या देशात कोरोना आजाराबाबत फार मोठी दैनी अवस्था पाहता रायगड जिल्ह्यात , म्हसळा तालुक्यात सुध्दा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे
         अशा परिस्थितीत नवतरुण मित्र मंडळ रातिवणे मुंबई यांनी २३ मे रोजी गावातील सर्वच कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे ४० किट वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री  हरिश्चंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला, तसेच उपस्थित कोळवट ग्रामपंचायत सरपंच श्री राजाराम तिलटकर उपस्थित होते, ग्रा.पं.सदस्या सौ.रिया मोरे तसेच नवतरुण मित्र मंडळ रातिवणे मुंबई मंडळाचे सर्वच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा