म्हसळा तालुका शिक्षकांकरवी २७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन


म्हसळा : वार्ताहर

कोरोनाच्या प्रादुर्भाव कार्यकाळात शिक्षक वर्गाला विद्यार्थ्यांना विद्यादान देण्याचे कार्य लांबणीवर पडल्याने शासन देईल ते कार्य करण्यास बहुतांश कर्मचारी आपापले योगदान देत आहेत.गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्र राज्यातील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा झाला असल्याने शासनाने नागरिकांना रक्तदान करण्याचे जाहीर आवाहन केले आहे त्यानुसार राज्यातील विविध सामाजिक व शासकीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून कोविड-19 योध्दा म्हणुन सहभाग घेवुन देश सेवेत हातभार लावण्याचे कौतुकास्पद काम करीत आहेत.त्याच धर्तीवर रायगड जिल्हा परिषद म्हसळा तालुका शिक्षकांनी दिनांक 27 मे 2020 रोजी तालुका शाळा म्हसळा येथे सकाळी 10 ते 4 वाजे पर्यंत रक्तदान शिबीर आयोजन केले असल्याचे शिक्षक संघटना संचालक नरेश सावंत,किशोर मोहिते सर,नाईकसर,कांबळे सर यांनी आयोजन करून आयोजीत देश सेवेच्या कामात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा