तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला असुन तालुक्यातील मौजे निगुडशेत कोरोना पाँझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळे काळजीचा ठोका वाढु लागला आहे. तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर कुटुंब घाटकोपर (पंतनगर)येथून १७/५/२० ट्रँव्हल्सने प्रवास करून१८/५/२० रोजी पहाटे तीन वाजता निगुडशेत गावी आले होते सदर कुटुंबाला रा जि.प शाळेत काँरन्टाईन करण्यात आले होते. त्यातील एका ३५ वर्षीय व्यक्तीस सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे २३/५/२० रोजी तपासणी साठी पाठवण्यात आले सदर व्यक्ती कोव्हींड-१९पाँझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट २५/५/२०२० रोजी प्राप्त झाला आहे. सदर व्यक्तीच्या समवेत कुटुंबातील आठ जण असून प्राथमिक शाळा परिसर प्रतिबाधित क्षेत्र म्हणून सिल केले आहे. आज पर्यंत तालुका कोरोना मुक्त स्वरूपात रहाण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करण्यात महसूल अधिकारी वर्ग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती, शिक्षक, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, पोलीस पाटील गाव अध्यक्ष आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणावर अहोरात्र मेहनतघेऊन दोन महीने काम करीत असतानामुंबईतून मात्र कोरोनाचा प्रसार होत आहे हे वास्तव वादी चित्र स्पष्ट दिसत आहे.तालुक्यातील सर्व जनता सुरक्षित असताना ग्रामीण भागातील तळेगांव,चरई(बु),शेनाटे, आणी निगुडशेत या गावात कोरोनाग्रस्त आढळून आल्याने मात्र तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी देखील अजून हि कोरोना संक्रमण रोखण्यासाठी गांभीर्याने घेतांना दिसून येत नाही. कमीत कमी संपर्क, कामाशीवाय बाहेर पडू न पडणे, सँनीटारझरचावापर,मास्कवापर,वै यक्तिक साफसफाई ठेवणे आवश्यक व गरजेचे आहे.प्रशासनाला सहकार्य करा.घरी रहा सुरक्षित रहा.आपल्या बरोबर इतरांची काळजी घ्या.असे प्रशासना कडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे.
إرسال تعليق