तळा तालुक्यात सापडला दुसरा कोरोना पाँझिटीव्ह रूग्ण ; पहिला कोरोना मुक्त होऊन घरी परतला.


तळा : किशोर पितळे

तळा तालुक्यात पहीला कोरोना पाँझिटीव्ह रूग्ण तळेगाव येथे सापडला होता. त्यांच्या समवेतभाऊ, आईसह इतरचार जण निगेटीव्ह निघाल्याने दिलासादायक बातमी होती. पण काल तालुक्यातील चरई बुद्रुक येथील ३० वर्षीय यूवकाला काँरन्टाईन करण्यात आले होते हि व्यक्ती मुलुडं(मुंबई) मधून १४ मे. रोजी खाजगी गाडीने सहा व्यक्ती सोबतआला होता. सदर व्यक्तीस ताप येऊ लागला असल्याने माणगांव येथील कोविंड ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यातआले होते सदर रिपोर्ट कोविंड लँब कळंबोली मुंबई येथून रात्री उशिरा पाँझीटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या वृताबरोबर आनंदाची बातमी म्हणजे पहिला तळेगाव येथील आढळलेला कोरोना पाॅजेटीव्ह रुग्ण स्थिर असुन लवकरच त्याला सोडण्यात येणार असे तहसिल कार्यालयातुन सांगण्यात आले आहे. तळा तालुक्यातील रुग्णांची संख्या दोनवर पोचली आहे. 
      चरई(बुद्रुक) येथील आढळलेल्या रुग्णाची टेस्ट कोरोना पाॅझेटीव्ह असल्याने या रुग्णाला पुढील तपासणी व कार्यवाहीसाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णाच्या सोबत असणारऱ्या सदस्यांची ही स्वॅब टेस्ट तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.त्यांचे रिपोर्ट आज संध्याकाळ पर्यंत येतील या सहा जणांना अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.आरोग्य विभाग व उसरखुर्द  ग्रामपंचायतच्या माध्यमातून रुग्ण राहत असलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.  मुंबईतून अनेक चाकरमानी प्रत्येक गावात कुटुंबा समवेत आले असून बहूसंख्य लोक हे हायस्पाँँट असलेल्या वरळी धारावी,विरार,नालासोपारा अशा उपनगरातून आले असल्याने भीती व्यक्त केली जात असून ग्रामीण भागातील सुरक्षित असणारी जनता आता कोरोनाच्या दहशती खाली वावरत आहेत.

"नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन व पोलिसांनी दिलेल्या सुचना व माहितेचे पालन करावे.अत्यावश्यक सेवे शिवाय विनाकारण नागरिकांनी बाहेर पडून गर्दी करु नये.अन्यथा विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल."
-श्री.सुरेश गेंगजे (तळा पोलिस निरिक्षक)

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा