डॉक्टर हे पृथ्वीवरील देवाचे रूप होय - अमित शेडगे, प्रांताधिकारी श्रीवर्धन


कोरोना निर्मुलनासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे ; खाजगी डॉक्टरांना प्रशासनाची साद 

डॉक्टर हे पृथ्वीवरील देवाचे रूप होय ....अमित शेडगे (प्रांताधिकारी श्रीवर्धन )


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना समाजातील सर्व स्तरातून कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा पुर्ण शक्तीनिशी या कोरोना विरुद्धच्या युद्धात सक्रिय झाली आहे. कोरोना विषाणूचा अंत करण्यासाठी डॉक्टर रुपी देव आज प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असे प्रतिपादन प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले. श्रीवर्धन तालुका प्रशासनाने शनिवारी सकाळी तालुक्यातील सर्व खाजगी डॉक्टरांशी संवाद साधला असता प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीवर्धन तालुक्यात कोरोनाची सद्य परिस्थिती नव्याने आढळेलेले रुग्ण शासकीय यंत्रणेचे सज्जता उपलब्ध मनुष्यबळ व आगामी काळातील वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाचा निर्माण होणारा तुटवडा या सर्व विषयांवर प्रांताधिकाऱ्यांनी मार्मिक भाष्य केले. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय, आराठी व जसवली हॉस्पिटल या तिनही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दर्जेदार सेवा डॉक्टर मधुकर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिली जाते. त्याच स्वरूपात आगामी काळ लक्षात घेऊन खाजगी डॉक्टरांकडून होणारा सहकार्य मोलाचं आहे. श्रीवर्धन मधील भोस्ते, दिघी, वडवली,खुजारे या विविध ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले. खाजगी डॉक्टर व सरकारी यंत्रणा यांच्यातील समन्वयामुळे आपण श्रीवर्धन तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात आपण यशस्वी झालेले आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. भविष्यात गरज पडल्यास खाजगी दवाखान्यातील विविध बाबी व साहित्यांचा उपयोग कोरोना निर्मूलनासाठी निश्चितच महत्वाचा ठरणार आहे असे अमित शेडगे यांनी सांगितले. श्रीवर्धन प्रांत कार्यालय सभागृहात आयोजित संवाद चर्चेत तहसीलदार सचिन गोसावी , डॉक्टर ऋषिकेश रुद्रावर , डॉ अतुल गँद्रे , डॉ अबू राऊत , डॉ संजय बापट ,डॉ कौस्तुभ जोशी , डॉ अमोल जोशी व श्रीवर्धन व बोर्लीपंचतन  मधील डॉक्टर उपस्थित होते .सदर संवाद चर्चेचे आयोजन करत असतांना सर्व  सोशल  डिस्टनस च्या नियमांचे पालन करण्यात आले .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा