खारगाव बु गावात खारगाव बु प्रिमिअर लीग - (KPL) मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
   दिनांक 11 मार्च 2020 रोजी होळी सणानिमित्त आई गावदेवी क्रिकेट संघ खारगाव बु आयोजित खारगाव बु प्रिमिअर लीग - (KPL) 2020 पर्व 3 रे क्रिकेट सामन्याचे आयोजन  करण्यात आले होते.
"गावातील युवकांना एकत्रित आणणे आणि त्यांच्या खेळाडू प्रवुत्तीस चालना मिळावी "या साठी या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.
या स्पर्धेचे उदघाटन म्हसळा तालुका  PSI श्री. धनंजय कोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत गावातीलच एकूण 16 संघांनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे प्रथम क्रमांक श्री अरुण जनार्धन वेटकोळी आणि श्रीरंग जनार्धन वेटकोळी यांच्या हस्ते - शिवगर्जना क्रिकेट संघ खारगाव बु यांना, तर द्वितीय क्रमांक श्री  किशोर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते - अद्वैद वारिअर्स क्रिकेट संघ खारगाव बु आणि तृतीय क्रमांक श्री मयूर दामोदर कांबळे यांच्या हस्ते- गावदेवी गावठाण क्रिकेट संघ खारगाव बु  यांना वितरित करण्यात आले. या स्पर्धेचे सामनावीर किताब श्री रवींद्र कांबळे यांच्या हस्ते कु. विनायक नाक्ती याना ,तर उत्कृष्ट गोलंदाज श्री हरिश्चंद्र नाक्ती यांच्या हस्ते अविनाश नाक्ती याना आणि उत्कृष्ट फलंदाज अजय गाणेकर याना प्रदान करण्यात आला 
  हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी" ग्रामस्थ मंडळ खारगाव बु आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खारगाव बु" यांनी विशेष मेहनत केली .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा