कोरोना विषाणू संक्रमण प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्या साठी केंद्रशाळा स्तरावर जनजागृती करणार

म्हसळा शिक्षण विभाग करणार जनजागृती.
करोना विषाणू संक्रमण प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्या साठी केंद्रशाळा स्तरावर करणार जनजागृती.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. आज म्हसळा तालुका रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमांतून म्हसळा व खामगाव येथे अध्यक्ष तथा सभापती कृषी व पशुसंवर्धन बबन शेठ मनवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने करोना विषाणू संक्रमण प्रतिबंधात्मक उपाय योजना व जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रांतील केंद्र प्रमुखाना केंद्रातील सर्व शिक्षकांच्या संर्पकांत राहून सर्तक राहण्याचे आदेश गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे यानी दिले.करोना विषाणू संक्रमण , त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय योजना , जनजागृती व शाळेंतील विद्यार्थी, पालक याना या विषयी शास्त्रोक्त माहीती देणे, गाव पातळीवरील अफवा थांबवणे ही महत्वाची जबाबदारी केंद्र प्रमुख व शिक्षकांवर असणार आहे. प्रत्येक केंद्र स्तरावर शिक्षकांचे एक पथक करून संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीयअधिका- ऱ्यां जवळ सलग्न रहाणार आहे.

"तालुका रुग्ण कल्याण समिती ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तालुक्यातील आमशेत,संदेरी , पाष्टी, चिखलप, वरवठणे,कणघर,म्हसळा, पाभरे, आडी,नेवरुळ, मेंदडी या केंद्रातील केंद्र प्रमुखाना सूचना दिल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही सुरु झाली.म्हसळा केंद्रातील शिक्षण उत्सव , कांदळवाडा सांस्कृतीक कार्यक्रम रद्द .करण्यात आले"
संतोष शेडगे,गट शिक्षण अधिकारी, म्हसळा

"करोना विषाणू आजाराबाबत सोशल माध्यमाव्दारे पसरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. गर्दीत जाणे टाळावे तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून दक्षता बाळगावी, परंतु भीती बाळगू नका"
डॉ. गणेश कांबळे , तालुका आरोग्य अधिकारी

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा