म्हसळा करांकडून ८ दिवसांत वसुल झाला रु ७६ हजार ५०० दंड.

म्हसळाकरानी शिस्तीचे पालन करावे पोलीस अधिक्षकांच्या विनंती नंतर वाहतुक पोलीसांची कारवाई सुरू ; म्हसळा करांकडून ८ दिवसांत वसुल झाला रु ७६ हजार ५०० दंड.

संजय खांबेटे : म्हसळा
बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी म्हसळा पोलीसानी कंबर कसली असुन बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत केवळ आठ दिवसांत( १ मार्च ते व ८मार्च ) रु ७६ हजार ५०० दंड वसुल केल्याचे वाहतुक हेड कॉस्टेबत दयानंद सरकटे यानी सांगितले.बहुतांश वाहन चालकांवर मोटर वाहन कायदा१९८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आसल्याचे सरकटे यानी सांगितले.वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचे लयसन्स नसणे,लायसन्सचे नूतनीकरण नसणे, वाहनाची नोंदणी नसणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, अती वेगाने गाडी चालविणे,दारू पिवुन किंवा अमली पदार्थाचे सेवन करुन वाहन चालवणे, हेल्मेट शिवाय गाडी चालविणे, आदी कारणानी वाहतुकदार व्यक्तींवर कारवाई केली.कारवाईसाठी म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी धनंजय पोरे , वाहतुक शाखा रायगडचे प्रभारी अधिकारी शहाजी शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई.दिपक डूस,वाहतुक पोलीस देवीदास सरखेले व जिल्हा वाहतुक शाखेचे अन्य कर्मचाऱ्यानी कामगीरी केली.

"म्हसळा करानी शिस्तीचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे , पोलीस तुमच्यासाठी सदैव तत्परतेने पुढे येतील असे जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यानी म्हसळा कराना मार्चचे पहिल्याच दिवशी सांगितले होते पोलीसांच्या कारवाईचे स्वागत आहे"


"म्हसळा पोलीस स्टेशन व वाहतुक पोलीस बेशीस्त वाहन चालकांवर करत असलेली कारवाई अत्यंत स्वागताई आहे,वाहन, वाहक आणि वाहतूक या मध्यवर्ती मुद्यांमध्ये शासन-प्रशासन, समाज-वाहनचालक व नागरिक हे महत्त्वपूर्ण असे अपरिहार्य घटक ठरतात या साऱ्यांची एक महत्त्वाची भूमिका असते, म्हसळ्यातील वाहतुक व्यवस्था सुरळीत रहाण्यासाठी नगरपंचायत प्रशासन महत्वाचा घटक ठरेल "
पार्वतीबाई सरदेशपांडे, म्हसळा.

"बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावावा ही म्हसळा करांची मागणी आहे,पोलीस त्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रोजच झटत असतो. उपलब्ध मनुष्यबळात व साधनसामुग्रीत पोलिसांची धडपड सुरू असते.अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे आहे"
धनंजय पोरे, सपोनी, म्हसळा

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा