संजय खांबटे : म्हसळा प्रतिनिधी
ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन रायगड जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हसळा तालुक्यातील खरसई येथील रास्त भाव धान्य दुकानाचे प्राधिकरणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे म्हसळा तहसीलदारांनी खरसई येथील रास्त भाव धान्य दुकानाची वितरण व्यवस्था बनोटी येथील महालक्ष्मी महिला बचत गटाकडे सोपवली आहे. या कारवाईने तालुक्यातील रास्त धान्य दुकानात काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
खरसई येथील रास्त भाव धान्य दुकान नं ७ चे हरीचंद्र म्हात्रे यांचे वितरण व्यवस्थे बाबत श्रीमती निशा नारायण पाटील व खरसई येथील अनंत कांबळे , सईद बलडे, अरुण माळी, भालचंद्र कांबळे,, नरेंद्र कातळकर, तानाजी म्हात्रे, प्रदीप शीतकर, महादेव कांबळे व अन्य ग्रामस्थानी केलेल्या तक्रारींची जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार म्हसळा यानी चौकशी करून कारवाई केल्याचे सांगण्यात आले.अनंत कांबळे व ग्रामस्थानी अशाच प्रकारची तक्रार मुख्यमंत्री आणि अन्न आणि नागरी पुरवठा खात्याकडे केली आहे.
"खरसई येथील रास्त भाव धान्य दुकान नं ७ योग्य वेळेत उघडत नाही, वितरकाची ग्राहकांजवळील वागण्याची पध्दत, वजनामध्ये तफावत, रेशन धान्य काळा बाजाराने विकणे, अशा तक्रारी करण्यात आल्या आसल्याने कारवाई झाली "
"खरसई येथील रास्त भाव धान्य दुकान नं ७च्या तक्रारी मुळे तेथील दुकानाचे प्राधिकरण पत्र रद्द करण्यात आले असून खरसई येथील वितरण व्यवस्था शेजारी असणाऱ्या महालक्ष्मी महिला बचतगट,बनोटी यांच्याकडे अस्थाई स्वरूपांत हस्तां तरीत करण्यात आले आहे "
नथुराम सानप ,पुरवठा अ.कारकून, म्हसळा
"खरसई गावात सुमारे ७५० कार्डधारक आहेत, कार्ड धारकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने लौकरांत लौकर खरसई गावात रास्त भाव धान्य दुकान सुरु करावे"
परशुराम मांदाडकर, माजी सरपंच व सामाजिक कायकर्ते, खरसई.
إرسال تعليق