एक हात मदतीचा : लॉकडाउन च्या काळात युवा संस्थेची कौतुकास्पद कामगिरी


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
कोरोना वायरस COVID 19 नाव ऐकताच आपल्या समोर चित्र उभं रहातं ते म्हणजे सोशल मीडियावर वर वायरल होत असलेल्या व्हीडीओ मध्ये पूर्ण पिशव्यांमध्ये गुंडाळलेले मृतदेह, रस्तयांवर, दवाखान्यात तडफडत पडलेली माणसं ज्यात आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित देशांचा देखील समावेश आहे. जागतिक माहामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोना COVID 19 मुळे बऱ्याचश्या देशांनी पणपण लॉकडाऊन हा मार्ग निवडलेला आहे. परिस्थिती चे गांभीर्य  लक्षात घेता भारतात ही २१ तारखेच्या  कर्फ़्यू नंतर तब्बल १४ एपिल पयंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे, ज्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गंभीर परिणाम हा रोजंदारी वर आयुष्य जगणाऱ्या नाका कामगार , घर कामगार महिला, फेरीवाले, बेघर इ. अश्या वंचित घटकांवर झाला आहे. आणि येणाऱ्या पुढच्या काळातही त्यांना अश्या हालाकीच्या परिस्थिती तुन जावे लागणार आहे. 
कोरोनाच्या अगोदर उपासमारी मुळेच जीव जाईल की काय ? असा प्रश्न भेडसावु लागला आहे.  
समाजातील अश्याच घटकांना आधार देण्यासाठी युवा संस्था गेल्या ३५ वर्षांपासून त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी कार्यरत आहे. सध्या परिस्थिती व त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन अश्या लॉकडाऊन च्या काळात वेळ न घालवता युवा संस्थेच्या सदस्यांनी नाका कामगार , घर कामगार महिला, फेरीवाले, बेघर इ. अश्या मुंबई व नवी मुंबई मधील गरजू परिवारांचे सर्वेक्षण केले व २७ मार्च या तारखा दरम्यान नवी मुंबईत ६०० हुन अधिक परिवारांना मदत पोहोचवली तर मुंबई व नवी मुंबईत एकूण १००० हुन अधिक परिवारांना या मदतीचा त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन लाभ दिला आहे. जीवनावश्यक साहित्य तांदूळ, गव्हाचे पीठ, तुरीची डाळ, मसाला, पालमौलीन तेल आणि सॅनिटरी पॅड यांचा समावेश आहे.                             जीवनावश्यक गोष्टीचे वाटप करताना युवा संस्थेच्या सदस्यांनी, असंघटीत कामगार वर्गाला येणारे अतयंत हालाखीचे जाणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी निर्णय घेतला आहे की जोपर्यंत लॉकडाऊन ची परिस्थिती असेल तोपर्यंत यवा संस्था गरजूंना अशी मदत पुरवीत राहील. 
 फोटो मध्ये युवा संस्थे चे नवी मुंबई सदस्य राज वंजारे, सिद्धांत म्हात्रे आणि अजय बोरकर वस्तीतील लोकांना गरजेच्या वस्त पुरविताना

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा