श्रीवर्धन शहरात लॉकडाऊन पाळला जातोय अतिशय उत्तम रीतीने,श्रीवर्धन पोलिसांनी ठेवलाय चोख बंदोबस्त.

                            छाया - संग्रहित

श्रीवर्धन प्रतिनिधी
संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळामध्ये संपूर्ण देशातील सार्वजनिक बस सेवा त्याच प्रमाणे रेल्वे सेवा, विमान वाहतूक इत्यादी सर्व थांबवून ठेवण्यात आलेले आहे. परदेशातून भारतात येणारी व भारतातून परदेशात जाणारी सर्व विमान सेवा रद्द करण्यात आलेली आहे. 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु झाल्या नंतर 23 मार्चला लोकांनी बाहेर येण्यासाठी खूप धडपड केली. परंतु कोरोना रूग्णांची देशात वाढती संख्या पाहून नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत पूर्णपणे भारत बंद राहील असेच जाहीर केले. याच आवाहनाला अनुसरून श्रीवर्धनमध्ये चांगल्याप्रकारे लॉक डाऊन पाळण्यात येत आहे. सकाळी काही काळ नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारात येतात परंतु सोशल डिस्टन्स ते भान राखून दुकानासमोर असलेल्या चौकोनात उभे राहून खरेदी करतात. त्याचप्रमाणे आता भाजी खरेदीसाठी श्रीवर्धनच्या शाळांच्या मैदानांचा वापर करण्यात येणार आहे. पहिले तीन-चार दिवस पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली परंतु आता नागरिक स्वयम् स्फूर्तीने लॉक डाऊन चे नियम पाळत आहेत. संपूर्ण श्रीवर्धन शहरात फेरफटका मारला असता कुठेही कोणीही फिरताना आढळून येत नाही. तर दुपारच्या वेळेत बाजारपेठेत पूर्ण शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार असून देखील श्रीवर्धन शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये नमाज साठी न जाता आपल्या घरांमध्ये नमाज अदा केली. शहरातील रिक्षा वाहतूक त्याचप्रमाणे सहाआसनी रिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. एकूणच श्रीवर्धन वासियांनी लॉक डाऊन खऱ्या अर्थाने पाळण्याचे धोरण अवलंबिले आहे.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा