प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
यजमान अमरदीप क्रीडा मंडळ सालविंडे ताडाची वाडी यांच्या वतीने होळी आणि शिवजयंती निम्मित घुमणार चौकार षटकरांची आतषबाजी. सालाबादप्रमाणे यावर्षी ही अमरदिप क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक 11/03/2020 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या संघाला रोख रक्कम १२००१ व अमर चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे रुपये ६००१ व ३००१ आणि अमर चषकाने सन्मानित करण्यात येईल असे आयोजकांनी सांगितले. तसेच उत्कृष्ट फलंदाज/गोलंदाज, मालिकावीर, शिस्तबद्ध संघ व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यांना ही अमर चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. प्रथम येणाऱ्या २४ संघानं प्राधान्य देण्यात येईल त्यामुळे इच्छुक संघांनी लवकरात लवकर सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या स्पर्धेतुन मिळणारे उत्पन्न गावातील शाळा डिजिटल करण्याचा अमरदीप क्रीडा मंडळाचा मानस आहे
मा. श्री. अनिल काप,मंडळाचे उपाध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
إرسال تعليق