संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
महसुल अधिकारी हा आपली सर्व कार्यालयीन कृत्ये आणि कामकाज यांच्या बाबतीत महाराष्ट्र जमीन महसुल १९६६ च्या अधिन राहून काम करत असतो परंतु म्हसळा शहरातील तब्बल तीन गावठणां बाबत महसुली अभिलेख व भूमी अभिलेख यामध्ये तफावत आसल्याचे पुढे आले आहे. तालुका भूमी अभिलेख खात्याच्या रेकॉर्ड प्रमाणे म्हसळा शहरांत केवळ ४ गावठणाची नोंद आसल्याची नोंद आहे. मागील २० वर्षापासून महसुली लेखात व तालुका भूमी अभिलेख यामधील तफावत दूर करण्यासाठी काहीच कारवाई झालेली दिसत नाही. महसुली लेखा बाबत म्हसळा तहसीलचे मंडळ अधिकारी व तलाठी यांजकडून मिळालेल्या माहीतीनुसार म्हसळा शहरात १ ते ७ गावठणे आसल्याचे लेखे उपलब्ध आहेत.गावठण क्रं.५-६ व ७ या ३गावठणांचे महसुली लेख भूमी अभिलेख विभागा पर्यंत जाईपर्यंत गहाळ कसे झाले हा प्रकार प्रचंड गंभीर आहे.
म्हसळा गावठण नं १मध्ये ५१७ प्रॉपर्टी, गा.नं २मध्ये १९ प्रॉपर्टी, गा.नं ३मध्ये ४० प्रॉपर्टी,नं ४ मध्ये २० प्रॉपर्टी आसल्या बाबत महसुल व भूमिअभीलेख यांचे एकमत आहे. परंतु गावठण नं ५ क्षेत्र १.४६ .१ प्रापर्टी हीस्से ४१ (कन्याशाळा शंकर मंदीर गोडाऊन परीसर ),गावठण नं ६ क्षेत्र १.२८. ५ प्रापर्टी हीस्से २५ (गौळवाडी परीसर),गावठण नं ७ क्षेत्र ६९.१ प्रापर्टी हीस्से ३० (बौद्धवाडी परीसर)या तीन गावठणाची तालुका व जिल्हा भूमी अभिलेख विभागात नोंदच नसल्याची धक्कादायक माहीती पुढे येत आहे.मागील २० वर्षापासून तालुका महसुल विभाग आणि भूमि अभिलेख विभागाच्या या त्रुटी असल्याचे दाखवून सुद्धा योग्य ती दखल का घेतली जात नाही हा गंभीर विषय बनलाआहे.

"वास्तविक पहाता महाराष्ट्र जमीन महसुल लेखे ( महसुल आधिकाऱ्यांची कार्यपद्धती ) नियम१९६६ आणि त्याखाली केलेल्या नियमां प्रमाणे संबधीत महसुली लेखे सुस्थितीत ठेवणे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यां- च्या मुख्य कर्तव्याचा भाग आहे." तरी सुध्दा दुर्लक्ष का झाले हे अद्यापही अनुत्तरीत आहे.
"महसुल विभागाकडून म्हसळा शहरांत १ते ७ गावठण असल्याचे आम्हाला ७/१२ मिळतात, आम्ही T.L.R. कडे मोजणी प्रस्ताव दिलेला आहे."
जयश्री कापरे, नगराध्यक्ष , नगरपंचायत म्हसळा.
"म्हसळा शहरांत १९५४- ५५ पर्यंत नगरपंचायत होती, त्यापूर्वीच गावठण क्रं ५ क्रमाने ६, ७ विस्तारीत झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थानी म्हणजे नगरपंचायतीने पुढाकार घेऊन मोजणी फी भरून सर्व महसुली व भूमी अभिलेख सुस्थितीत करणे आवश्यक आहे.
सलीम चौगुले , माजी सरपंच , म्हसळा गृ. ग्रा.पंचायत.
"आमच्या अकारबंदानुसार म्हसळा शहरांत गावठण क्रं १ते ४ दाखवत आहेत. गावठण क्रं ५ ( कन्या शाळा परिसर)/६ ( गौळवाडी )/७ ( बौद्धवाडी ) साठी गावठण विस्तार प्रकरण करता यईल"
महेंद्र मोहीते , उप अधिक्षक भूमी अभिलेख ,म्हसळा.
" आमचेकडे असलेले गावठण क्रं .५/६/७ चे महसुल लेखे फेरफार तपासून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल"
शरद गोसावी , तहसीलदार, म्हसळा.
إرسال تعليق