संजय खांबेेेटे : म्हसळा प्रतिनिधी
लोणावळा शहराच्या निसर्गरम्य परिसरात ‘न्यू वे’चे मनशक्ती केंद्राचे प्रयोग केंद्रामार्फत आंगणवाडी सेविका- मदतनीसां होणाऱ्या कार्यशाळेतील अनेक विषयांमुळे आंगणवाडी सेविका- मदतनीसांचे मन शक्तीमान होईल असे मत बाल विकास प्रकल्प विभागाचे माजी अध्यक्ष व्यंकटेश सावंत यानी म्हसळा बाल विकास प्रकल्प विभाग मार्फत आंगणवाडी सेविका- मदतनीसांचे कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी म्हसळा पंचायत समितीच्या सभापती उज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर ,माजी सभापती छाया म्हात्रे, सहाय्यक ग.वि.अ.प्रदीप डोलारे , (प्र) ग.शि.अ.संतोष शेडगे, मनशक्ती केंद्राचे प्रशिक्षक अजित फापाळे,भालचंद्र आवटे, जयसोंग खराबे,विस्तार अधिकारी प्रमोद गायकवाड, पर्यवेक्षिका श्रीमती वैष्णवी कळबासकर, दिपाली .पालवे, कल्पेश पालांडे, रेणुका पाटील तालुक्यातील आंगणवाडी सेविका बहुसंखेने हजर होते.
कार्यशाळेत ताणमुक्त व अर्थपूर्ण जीवनासाठी, गर्भसंस्कारा पासून मृत्यृ-पश्चात जीवनापर्यंतचे, तसेच आम्हाला प्रतिभासंपन्न, बुद्धिमान, सुजाण मूल हवे आहे,’ असे नवदांपत्याचे स्वप्न असते. परंतु त्यासाठी योग्य तो प्रयत्न व तयारी गर्भधारणा होण्यापूर्वी पती-पत्नीने करणे आवश्यक असते. तसेच गर्भधारणा झाल्यावरही गर्भावर योग्य तो वैचारिक संस्कार करायचा असतो. त्याचे गर्भाकडे प्रचंड सामर्थ्य असते. गर्भावस्थेपासूनच मूल अनेक अनुभव घेत असते. शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी गर्भावस्थेतले प्रयत्न उपयोगी ठरतात. त्यासाठी गर्भसंस्काराची प्रक्रिया पालकांनी समजून घेणे , आवश्यक आहे.ज्येष्ठ नागरिक हा कुटुंबातील आणि समाजा तील एक आदरणीय आणि अनुभवसंपन्न असा घटक. म्हणूनच आतापर्यंत, त्यांचे एक वेगळ महत्व आणि स्थान असायचे, परंतु एकत्र कुटुंब पद्धती कमी होऊन सध्याची विभक्त कुटुंब पद्धती वाढली, तसे या ज्येष्ठांबद्दलच्या समस्या वाढल्या. आणि त्याची परिणती म्हणून आज आपण समाजात वृद्धाश्रम वाढलेले पाहतो. अशा या ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक शारीरिक, भावनिक आणि सामाजिक समस्या,वृद्धापकाळातील समतोल, सुखमय जीवनाचे विज्ञान, वनप्रस्थाश्रमी जीवन, तटस्थतेचा आदर्श म्हणजे नक्की काय? या अनेक विषयांबाबत विस्तृत माहीती कार्यशाळेत दिली गेली.

"शंका -कुशंका या महत्वाच्या विषयांत आमिषा कर्णिक, संध्या म्हात्रे, स्नेहल विचारे, उज्वला गोसावी या अंगणवाडी सेविकानी आपल्या अनुभवांतून एकाग्रता, लहान मुलांचा मेंदू सक्षमते बद्दल आपल्या समस्यांचे निराकरण करून घेतले"
"गेली अनेक वर्षे हजारोंच्या संख्येने लोक ज्या केंद्रात मनशांतीकरीता जात आहेत त्या केंद्राचे तज्ञ प्रशिक्षक आमच्या तालुक्यांत येऊन समाजघटकांत तळमळीने काम करणाऱ्या तालुक्यातील आंगणवाडी सेविकांसांसाठी कार्यशाळा घेत आहेत हे आमच्या तालुक्याचे भाग्य आहे "
श्रीमती उज्वला सावंत, सभापती , पंचायत समिती म्हसळा.

" प्रशिक्षणांत बाल मुलांचा शारीरीक, मानसिक व बौद्धिक विकास समतोल होण्यासाठी मुलांसाठी, पालकांसाठी व शिक्षक ,अंगणवाडी सेविका व मदतनीस याना दिलेल्या प्रार्थना व प्रयोग अतिशय प्रभावी आहेत . अशा पद्धतीच्या कार्यशाळा वर्षांतून किमान दोन वेळा व्हाव्या "
श्रीमती छाया म्हात्रे माजी सभापती.
إرسال تعليق