तळा रिक्षा चालक मालक संघटनेची महापूजा संपन्न ; संघटनेतून हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडले दर्शन.


तळा (श्री किशोर पितळे)
तळा तालुका रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे मंगळवार दि.११ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती.संघटनेचे अध्यक्ष सुनील कोटकर सपंत्निक यांच्या हस्ते करण्यात आली. संघटनेचे हे पहिलेच वर्ष असून संघटनेत हिंदू बांधवांसोबतच मुस्लिम बांधवांची संख्या देखील लक्षणीय आहे. पूजेची तयारी करताना मुस्लिम बांधव हिरीरीने सहभागी झाले होते तसेच पूजेच्या वेळी सर्वांनी सफेद रंगाचे शर्ट पॅन्ट व पारंपरिक गांधी टोपी परिधान केल्या होत्या या निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. तळा हा दुर्गम तालुका असून रोजगार नसल्याने परीसर मोठा असून ग्रामीण भागात दळणवळणाचे साधन म्हणून  रिक्षा व्यवसाय सुरू केला बराचसा तरुण वर्ग मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरीसाठी गेल्याने गावातील नागरिकांची संख्या बरीचशी कमी झाली आहे त्यामुळे रिक्षा चालकांना पुरेसा धंदा मिळत नाही अशा परिस्थितीतही ४० हिंदू व २० मुस्लिम बांधव सभासद असलेल्या या संघटनेने एकत्र मिळून सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवून दिल्याने नागरिकांमधून संघटनेचे कौतुक होत आहे. प्रथमच घातलेल्या पूजेच्या निमित्ताने मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी 
व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ.रेश्मा मुंढे, उपनगराध्यक्षा सौ.सायली खातू,सर्वनगरसेवक,नगरसेविका,सल्लागार राकेश वडके लिलाधर खातू ,माजी सरपंच नमीत पाढंरकामे नेतृत्व रामदासशेट तळकरपत्रकार किशोर पितळे, उपस्थित होते मान्यवरासह,माजी अध्यक्ष, मिनिडोअर अध्यक्ष, अँपेरिक्षा अध्यक्ष यांचा देखील सन्मान करण्यात आला.यावेळी नगरसेवक चंद्रकांत रोडे यांनीशुभेच्छा देताना म्हणाले की या संघटनेची पहिलीचपुजेचेआयोजन करून सर्व धर्म समभाव ऐक्याचा आदर्श समाजापुढे ठेवलाआहे.हे निश्चितच कौतुकास्पद आहे.आपल्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही सदैव पाठीशी राहून सहकार्य केले जाईल असे सांगून शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्षा रेश्मा मुंढे म्हणाल्या की रिक्षाने प्रवास करणारे सर्व सामान्य नागरिक असतात त्यांना योग्य ठिकाणी सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे हि मंडळी करीत असतात.आजच्या युगातमहिलासुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाआहे परंतु तालुक्यातील महीला या रीक्षा मधून प्रवास करीत असुन विश्वास ठेवून प्रवास करीत आहेत ही संघटना महीला वर्गाची सुरक्षित काळजी घेऊन सुखरूप पोहोचवते  याचा अभिमान वाटतो याचे कौतुक करते.आम्ही नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे आहोतअसे सांगितले. संघटनेचे अध्यक्ष सुनिल कोटकर, उपाध्यक्ष हमीद कुरुक्कर, खजिनदार अनिलसावंत, उपखजिनदार आत्माराम चव्हाण, सेक्रेटरी सचिन अंबार्ले, सल्लागार राकेश वडके,कायदेशीर सल्लागार अँड. चेतन चव्हाण यांसह संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री आठ वाजता श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजनाचा कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा