राजस्थान समाज मंडळ म्हसळा,महाशिवरात्री सोहळ्यात हजारोंच्या संख्येने घेतला महाप्रसाचा लाभ.

राजस्थान समाज मंडळ म्हसळा,महाशिवरात्री सोहळ्यात हजारोंच्या संख्येने घेतला महाप्रसाचा लाभ.

कार्यक्रम आयोजकांचे भक्तांनी कौतुक करून दिले धन्यवाद.

संजय खांबेेे : टेम्हसळा -प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे राजस्थान समाज मंडळाच्या वतीने म्हसळा येथील शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव कार्यक्रम दिनांक 21 फेब्रुवारी रोजी मोठया उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.अभ्यंगस्नान,आरती,तिर्थप्रासाद,भजनसंध्या हे कार्यक्रम संपल्यावर दुसऱ्या दिवशी मंडळाने हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिला.म्हसळा निवासी राजस्थान समाज मंडळ हे पूर्णपणे व्यावसायिक आहे. समाज मंडळ श्री गौरीशंकराचे निस्सीम भक्त आहेत.श्रद्धेने दर वर्षी शिवरात्री उत्सवात शिवमंदिरात गेली पाच वर्षे म्हसळा येथील भक्तांना महाप्रसादाचा लाभ देतात.या वर्षीही आयोजित कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.समाजतील लहान थोरांनी सेवा भावाने आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडला.सुनियोजित आणि धार्मिक कार्यक्रमाचे म्हसळा वासीय नागरिकांनी कौतुक केले व मनोमन धन्यवाद दिले.

म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरीचे शासकीय नोंद बुकात (गॅजेट)नाव महेश्वर असे नोंद आहे.त्या काळात येथे मोठया तलावा शेजारी श्री शंकराचे भव्यदिव्य मंदिर होते ते ब्रिटिश राजवटीत पाडण्यात आले असल्याची इतिहासात नोंद आहे.तेव्हा म्हसळा तालुका शहराचे खरे नाव महेश्वर असे होते तेव्हाच्या मुसोपल्ली ब्रिटिश राजवटीमधील लोकांना गावाचा नाव नीट उच्चारता येत नसावा म्हणून महेश्वराचे म्हसळा असा उल्लेख करण्यात आले असल्याचे गॅजेट मध्ये नमुद करण्यात आले आहे.कालांतराने येथील लोकांनी हे श्रद्धास्थान

दक्षिणेकडुन उत्तरेकडील दिशेने वाहत जात असलेल्या गावा शेजारील नदी किनारी दगडी बांधकाम केलेले भगवान श्री शंकरराचे भव्य मंदिर बांधले होते.10 वर्षांपूर्वीच म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळीने पुढाकार घेऊन येथे महेश्वराचे मंदिर उभारले आहे.दक्षिणेकडील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिणकाशी म्हणुन सुप्रसिद्ध असणारे हरिहरेश्वर,म्हसळाचे महेश्वर,देवघरात अमृतेश्वर आणि घुमचे घुमेश्वर हे संगमस्थान असणारे स्वयंभु महाशिवाचे मंदिर पांडव कालीन तीर्थक्षेत्र आहेत.नव्याने येथे पर्यटनात वाढ झाली आहे.येथे वर्षभर लाखोंच्या संख्येने भक्तगण मंदिरात देवदर्शन घेण्यासाठी येत असतात. 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा