म्हसळा प्राथमिक शाळा नं १ ने म्हसळाकरांना दिली सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी.

म्हसळा प्राथमिक शाळा नं १ ने म्हसळाकरांना दिली सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी.
कार्यक्रमांतून दिले बेटी बचाव-बेटी पढाँव चे संदेश
( म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहरांतील प्राथमिक शाळा नं १ ने वार्षिक सांस्कृतिक व स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या विविध नाटकाच्या माध्यमातून स्वच्छ भारत, झाडे लावा झाडे जगवा, व्यसन मुक्ती,बेटी बचाव-बेटी पढाँव चे संदेश तसेच आई आणि वडीलांचा आदर कसा करावा अश्या अनेक प्रकारचे नृत्य सादर करून स्थानिकांना कार्यक्रमाची मेजवानी दिली. कार्यक्रमाला नगराध्यक्षा जयश्री कापरे , माजी सभापती छाया म्हात्रे, शहर हिंदू समाज अध्यक्ष सुभाष उर्फ भाऊ करडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती मयुरी बनकर, सुनिल अंजर्लेंकर, श्रीमती मेघना कदम, अंजली सावदकर,सतिश शिगवण, मोलकरीण बाई सीरीयल मधील कलाकार विनोदकुमार नरके ,शाळेचे माजी विद्यार्थी व बहुसंखेने पालक उपस्थित होते. कार्यक्रमांत अंगणवाडीतील मुलांसह १ली ते ४थी च्या विद्यार्थानी विविध चाळीस कार्यक्रम सादर केले.
"यावेळी सोनल भूरपल्ले, कल्पना चव्हाण, तनुष्का कदम, कादंबरी जाधव, अद्वेत कदम, स्वामी करंबे, निशांत वेदक आदी विद्यार्थी व त्यांच्या गृपने सादर केलेल्या राष्ट्रगीत, पोवाडे व राष्ट्रीय उपक्रमाच्या संदेशातून प्रेक्षकांची दाद मिळवली."
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभदा दातार, राजेंद्र मालुसुरे, श्रीमती सुमित्रा खेडेकर, वंदना खोत, कल्पना पाटील यांच्या बरोबरीने राम रहाटे, समीर पाष्टे, प्रकाश मांडवकर , रमेश जाधव यानी विशेष मेहनत घेतली.


"म्हसळा प्राथमिक शाळा नं १ ने स्नेहसंमेलनात सादर केलेला कार्यक्रम पाहून बालकलाकारामागचा धडपडणारा शिक्षक हा सतत जाणवत होता. सादर झालेल्या कार्यक्रमातून शिक्षकांच्या संवेदन शीलतेची जाणिव झाली. ग्रामिण भागांत उत्कृष्ट कलाकार घडत आहेत."
विनोदकुमार नरके, कलाकार (मालिका मोलकरीण बाई )

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा