म्हसळा नगरपंचायत विषय समितीच्या सभापतींची निवड

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
नगरपंचायतीत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या निवडीनंतर विषय समितीच्या सभापतिपदाची निवडही बिनविरोध झाली आहे . १७ जानेवारी , २०२० रोजी म्हसळा नगरपंचायतीच्या संपन्न झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष सुहेब सलाम हलदे यांची आरोग्य सभापती नगरसेवक किरण गोविंद गायकवाड यांची सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापतिपदी निवड करण्यात आली तर माजी नगराध्यक्षा कविता शीतल ( भाई ) बोरकर पाणीपुरवठा जलनिस्सारण समिती सभापती नगरसेविका सेजल संजय खताते महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे . निवडणूक कामासाठी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार शरद गोसावी यांनी काम पाहिले . यावेळी नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज उकिर्डे उपस्थित होते . खासदार सुनील तटकरे यांचे आदेशानुसार म्हसळा नगरपंचतीच्या विषय समितीचे सभापतिपदांची निवड बिनविरोध करण्यात आली असल्याचे समजते . . म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या धर्तीवर म्हसळा नगरपंचतीच्या नगराध्यक्षपदी जयश्री कापरे तर उपनगराध्यक्ष पद कांग्रेसचे सुहेब हलदे यांना देण्यात आले आहे . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा