म्हसळा विद्यालयातील विद्यार्थ्यांना अवकाशाचे धडे

                       छायाचित्र - संग्रहित
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
विश्वाची निर्मिती कशी झाली ? त्याचा विस्तार वय किती आहे . सूर्यमाला व त्यातील ग्रह , तारे याविषयी खोगल शास्त्रज्ञ डॉ विशाल कुंभारे यांनी म्हसळा येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत टेलिस्कोपच्या माध्यमातून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज , म्हसळा येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह उत्सव या शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो . या अनुषंगाने मुंबई जिल्हा आणि म्हसळा ( ग्रामीण विभाग कुंभार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत पुणे येथील ब्रम्हांडिनीयोग अवकाश संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक खगोलशास्त्रज्ञ डॉ . विशाल कुंभारे यांनी येथील विद्यार्थीवर्गाला खगोलशान व अवकाशाचे धडे दिले . सदर कार्यक्रमास उपस्थित खगोलशाखज्ञ डॉ . विशाल कुंभारे कार्यक्रमाचे उद्घाटक महेश सायकर कोकण कुंभार समाज अध्यक्ष , प्रमुख आयोजक जितेंद्र विठोबा पाभरेकर कार्याध्यक्ष मुंबई जिल्हा ) , संतोष कुडेकर ( सहसचिव कुंभार समाज म्हसळा ) , या संस्थेचे स्थानिक कमिटी चेअरमन समीर बनकर , विस्तार अधिकारी नगर पंचायत म्हसळा सुनील गायकवाड , दिनेश म्हशीलकर उपाध्यक्ष कुंभार समाज म्हसळा , अभय कलमकर ( युवा अध्यक्ष कुंभार समाज ) , शांताराम कुडेकर माजी अध्यक्ष श्रीवर्धन म्हसळा तालुका कुंभार समाज मुंबई , गजानन चेऊलकर सचिव कुंभार समाज म्हसळा मुबई . विशाल सायकर उद्योजक , महेश म्हशीलकर युवा उपाध्यक्ष म्हसळा वासंती म्हशीलकर महिला अध्यक्ष कुंभार समाज म्हसळा नितीन बोरकर , मुन्ना टिके , योगेश करडे , जेष्ठ प्राचार्य के . ल . जाधव , सूर्यवंशी , मंगेश कदम , डॉ . एम एस पालक अश्विनी सायकर , गजानन थळकर यांच्यासह विद्यार्थी शिक्षकवर्ग बहसंख्येने उपस्थित होते . यावेळी चेअरमन सुनील बनकर , विस्तार अधिकारी सुनील गायकवाड महेश सायकर , जितेंद्र पाभरेकर आदीनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन श्री संत गोरोबाकाका , श्री स्वामी विवेकानंद आदिच्या प्रतिमेचे पूजन तसेच शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुखे यांच्या स्मारकाला पुष्पमालिका अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . प्रास्ताविक शिक्षक सूर्यवंशी यांनी केले . सूत्रसंचालन एस एस शिंदे यांनी केले तर आभार प्राचार्य के एल जाधव यांनी केले . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा