बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार आदिती तटकरे यांचे आश्वासन ; महिला मेळाव्याला अलोट गर्दी
रोहे : महादेव सरसंबे वरसे जिल्हा परीषद मतदारसंघातून राजकीय प्रवास सुरू झाल्यानंतर मी या मतदार संघात सतत येत आहे . विविध समस्या सोडविताना या मतदारसंघातील लोकांशी आपुलकीचे नाते तयार झाले आहे . महिलांच्या जिव्हाळयाचे पाणी प्रश्न सोडविताना दसरा टप्पा ही लवकर पूर्ण होवून चांगल्या पध्दतीने पाण्याचे नियोजन या मतदार संघात होईल . घनकचरा प्रश्न सोडविण्यासाठी शहाराच्या धर्तीवर आराखडा तयार करून त्या सभोवताली ग्रामपंचायतीना सामावुन घेवुन हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण पुढाकर घेणार आहोत . सगळयात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी बचतगट भवनाचे काम चालु आहे . ते काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करण्यात येईल परंतु या ठिकाणी ज्या महिला बचत गट आहेत . त्यांच्या उत्पादनाला बाजार पेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आधी झाला . त्यामध्ये आपण कमी पडलो या पुढे महीला बचत गटांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्योग , पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी महीलांच्या मेळाव्यात व्यक्त केले . यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणी मधुकर पाटील , पंचायत समिती सभापती गुलाब वाघमारे , सरपंच मिना म्हात्रे , उपसरपंच अमित मोहीते , ग्रा . प . सदस्य शर्मिला तांबे डॉ . स्वप्नाली पाटील , छाया सुर्वे , मयुरी कांबळे , जनी वारगुडा , मनिषा करंजे , मालीनी सकपाळ , वैजयंता पडवळ , विमल निकम , रामा म्हात्रे , राकेश गुरव , टी . आर . पाटील , नरेश पाटील , गणेश शिवलकर , ग्रामसेवक अशोक गट्टे , मनोहर सुर्वे , राकेश करंजे , अशोक निकम आदी उपस्थित होते . मधुकर पाटील यांनी ना . आदिती तटकरे यांचा रोहा तालुक्यात पहिल्यांदा मंत्री झाल्यावर सन्मान करण्याचा मान मिळाला आहे . महिलांच्या उपक्रमाला नेहमीच त्या वरसे ग्रामपंचायत हददीत येत असतात . ना . आदिती तटकरे यांच्याकडे महीला बचत गटाला बाजरपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी करीत शहाराच्या जवळ असालेल्या मोठया ग्रापंचायतील शहर आराखडा तयार करणे , घन कचरा विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प , पावसाळी पाण्याचा त्रास होवु नये यासाठी रोहा कोलाड मार्गावर । मोठे ड्रेनेज आदी कामांची पूर्तता आपणकडुन व्हावी अशी मागणी यावेळी केली . यावेळी ग्रा . पंचायत हद्दीतील महिलांच्या विविध कार्यक्रमासह हळदीकुंकु हा कार्यक्रम घेण्यात आला .
या मतदार संघात काम करीत असताना अनेक कामे आम्ही केली आहेत . या मतदार संघातील भुवनेश्वर येथील शंकर मंदीराचे काम पूर्ण होत आले आहे . त्या कामाला निधी कमी पडत आहे . मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्हाला या वर्षाचा आमदार निधी देण्यात आला आहे . त्यातून कामाच्या निधीचे पत्र वरसे ग्रामपंचायतीला देणार आहे . अदिती तटकरे , पालकमंत्री , रायगड
إرسال تعليق