मकरसंक्रांती सणासाठी सुगडी बनविण्याचा पारंपारीक व्यवसाय सुरू...

म्हसळयात मकरसंक्रांती सणासाठी सुगडी बनविण्याचा पारंपारीक व्यवसाय सुरू ; कुंभार समाजाच्या महीला व्यवसायात अघाडीवर
संजय खांबेटे  म्हसळा प्रतिनिधी
म्हसळ्यात मकरसंक्रांती सणासाठी सुगडी बनविण्याचा कुंभार समाजाचा पारंपारीक व्यवसाय जोराने सुरु आहे. श्रीवर्धन -म्हसळा -बोर्लीपंचतन या बहुतांश शहरी व अन्य भागात आवश्यकता लागणारी सुगडी याच परिसरांतील कुंभार समाजातील महीला वर्ग बनविणे व विक्री करणे करत असतात.
दोन तालुक्यातील म्हसळा, श्रीवर्धन, भट्टीचामाळ, गालसुरे, दिवेआगर, गोंडघर,बोर्ली पंचतन, वांजळे, पाभरे, निगडी व कुडगाव यासुमारे ११ गावांतील कुंभार समाज सुगडी व अन्य मातीच्या विविध वस्तू बनवितात. म्हसळा कुंभार वाडयात मातीच्या बहुविध वस्तू बनविणारे संत गोरा कुंभार व उत्कर्ष महीला बचत गट कार्यरत आहेत. समाजाचे या पारंपारीक व्यवसायांत श्रीमती वंदना वसंत बिरवाडकर, लता गजानन परबळकर, वासंती विठोबा म्हशीलकर, अनुसुया नथुराम म्हशीलकर,जयश्री गोपीनाथ म्हशीलकर या महीलांचा मातीच्या वस्तू बनविण्यात हातखंडा आहे. यामध्ये माठ,चूल,तवा, पणत्या, कुंडया, दही लावण्यासाठी मडकी , लहान मुलांची खेळणी अशा विविध प्रकारच्या वस्तू कोणत्याही यंत्राचा वापर न करता बनवितात.

"म्हसळा शहरांत सुगडी आंध्र, गुजरात मधून येतात, स्थानिक महीला मात्र स्थानिक मातीच्या लाल काळया सुगडयाना विशेष पसंती देतात "
श्रीमती कर्णिक.

मकरसंक्रांतीसाठी महिला वर्गातुन सुगडयांना मोठी मागणी असते. यादिवशी सुवासिनी सुगडयांचं खण ( पाच सुगडी ) घेऊन पूजा अर्चा करतात. स्त्रिया हरभरे, ऊस, बोरे,तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. तसेच सवासिनी एकमेकींना सुगडयाचे वाण देखील देतात.  घरांतील नव्याने आलेली सून ( पाच सुगडी ) देवाला ठेवण्याची प्रथा आहे.
-श्रीमती मिनल ढवळे, म्हसळा

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा