वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात स्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला ,वाणिज्य व बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतीक विभागा अंतर्गत भारतीय स्री मुक्तीच्या व स्री शिक्षणाच्या प्रणेत्या भारतातील प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८९ वी जयंती उत्साहाच्या आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली क्रांतीज्योतीच्या उत्सव सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी खरसई गावातील ग्रामस्थ आणि महाविद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे सदस्य श्री.धर्मा पाटील आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.एन.राघवराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीस महाविद्यालयातील वरिष्ठ लेखनिक सौ.वनिता समेळ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर व्दितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थीनी कु.अर्चना येलवे हीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा परीचय करुन देताना डिजिटल युगातील स्री शिक्षणाचे महत्त्व याविषयावर आपले मनोगत व्यक्त करताना अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडा मध्येे अडकलेल्या समाजात शिक्षण प्रसाराचे कार्य करताना सावित्रीबाईंना आलेल्या अडचणी , झालेले त्रास आणि अपमान याविषयावर माहीती देताना सावित्रीबाईच्या याकार्यात ज्योतिबांनी केलेले सहकार्य याबाबतही उदाहरणे दिली आणि आजच्या या डिजिटल युगात स्रीयांनी केवळ प्रसार माध्यमातून दाखविल्या जाणाऱ्या मालिका मध्ये अडकुन राहु नये तर परंपरागत विद्यापीठात किंवा मुक्त विद्यापिठात प्रवेश घेऊन उच्चवविद्या विभुषित होणे आणि आजच्या डिजिटल युगाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी अर्थसाक्षर आणि डिजिटल साक्षर होणे देखिल गरजेचे आहे त्यासाठी प्रत्येक स्रीने गुगल,युट्युब याचा वापर करुन संगणक साक्षर होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रत्येक पुरुषाने वडील, भाऊ,नवरा,मुलगा ,मित्र या नात्यातुन स्रीयानां सहकार्य करणे गरजेचे आहे असे परखड मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.शिरीष समेळ यांनी केले
إرسال تعليق