संजय खांबेेेटे म्हसळा प्रतिनिधी
शिवसेना उपनेते तथा म्हाडा सभापती (राज्यमंत्री दर्जा) मा.श्री. विनोद घोसाळकर यांनी आज म्हसळा तालुक्याचा दौरा केला. पक्ष संघटना वाढ, ग्राम पातळीवरील विकास कामे, शेतकरी- मच्छिमार यांच्या समस्या याबाबत महत्वाचे विषय हाताळले .यावेळी झालेल्या बैठकिला तालुका प्रमुख महादेव पाटील, जेष्ठ पदाधिकारी बाळशेठ करडे, क्षेत्र संघटक रवींद्र लाड, अनिल महामुनकर, उपतालुका प्रमुख अनंत कांबळे, राजाराम तीळटकर, आंबेत चे शाखा प्रमुख चंद्रकांत सावंत, अमित महामुनकर, महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकार, विभाग प्रमुख गणू बारे, हेमंत नाक्ती, फैयाज उकये,पांडुरंग सुतार, कृष्णा म्हात्रे,निशा पाटील , काजी आदी मान्यवर व मोठया प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. राज्यात महाआघाडीचे सरकार मुख्यमंत्री मा. उध्ववजी ठाकरे यांच्या नेतृत्वाने आहे. उद्धवजींचा कल संघटना वाढ, शिवसैनिकां- सह समाजातील शेवटच्या घटकाची पारदर्शकपणे विकास कामे व्हावी असा आहे. त्यासाठी आपण सर्वानी प्रत्येक गाव-वाडी व पाड्यांवर संघटना स्थापन करणे, शाखा प्रमुखाची नेमणूक करण्याचे काम करू यात. तालुक्यात शिवसैनिकांसह शिवसेनेला मानणारा हितचिंतक वर्ग फार मोठ्या प्रमाणावर आहे यांच्या संपर्कांत राहून संघटनावाढ करणे , पालकमंत्री, अन्य मंडळ व कमीत्यांवरील चेअरमन व सदस्यांमार्फत विकास कामे करणे हे आपले प्रमुख लक्ष्य उद्दीष्ट रहाणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना तालुका मध्यवर्ती कार्यालय येथे तालुक्याच्या वतीने विनोद घोसाळकर यांचा तालुका प्रमुख महादेव पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
إرسال تعليق