प्रदर्शनामधून भावी वैज्ञानिक तयार होतील आमदार अदिती तटकरे यांचे प्रतिपादन

दिघी : प्रतिनिधी
विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणारे विद्यार्थी हे आपल्या देशाचे भवितव्य असून त्यांच्या संशोधक वृत्तीला वाव मिळणे गरजेचे आहे . विज्ञान प्रदर्शनात पालकांनी सहकार्य करावे व पाल्याला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावे . विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक नक्कीच तयार होतील. असे मत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार आदिती तटकरे व्यक्त केले . श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील पंचतन संस्थेच्या गो . लिमये विद्यामंदिर येथे तालुकास्तरीय १५ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले . यावेळी त्या बोलत होत्या . यावेळी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला . इयत्ता पहिली ते आठवी या प्राथमिक गटात ६१ प्रतिकृती तर इयत्ता नववी ते बारावी या माध्यमिक गटात ४८ प्रतिकृतींचा समावेश होता . विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांच्यादेखील विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांच्यादेखील शैक्षणिक साहित्याचा समावेश होता कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी श्रीवर्धन पंचायत समिती सभापती मीना गाणेकर होत्या . विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सायली तोडलेकर व प्रगती अदावडे श्रीवर्धन पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक , पंचतन शिक्षण संस्था दिवेआगर अध्यक्ष अध्यक्ष विजय तोडणकर , सुचिन किर सिध्देश कोसबे , विजय ठोसर , गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे गटशिक्षणाधिकारी नूरमोहमद राऊत तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष संदीप तमनर तालका गणित मंडळ अध्यक्ष शिवप्रसाद वारुळे , जिल्हा विज्ञान मंडळ प्रतिनिधी नामदेव वराळे . केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते . 


प्रदर्शनात दांडगुरी केंद्र शाळांचे सुयश 
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दांडगुरी केंद्र शाळेला यश मिळाले आहे . पूर्व प्राथमिक गटात देवखोल शाळेच्या मयूर सोलकरच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक तर वावेपंचतन शाळेच्या संस्कृती ढापले या विद्यार्थ्यांनीच्या 'पाण्याची घनता ' या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाले . प्राथमिक गटातील शैक्षणिक साहित्य प्रकारात कासारकोंड येथील अंकुश पाटील यांच्या नकाशावाचन ' साहित्याला व्दितीय क्रमांक तर वाकलघर येथील सुनिता पडवळ यांच्या ' दोस्ती अंकाची ' या साहित्याला तृतीय क्रमांक मिळाले . दांडगूरी शाळेच्या सोनिया सावंत या विद्यार्थ्यानीचा विज्ञानात भारताचे योगदान ' या विषयाने माध्यमिक गटात द्वितीय क्रमांक संपादन केले . विज्ञान प्रदर्शनात दांडगुरी केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या यश मिळवण्यासाठी सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले .

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा