२२ ते २५ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता : हवामान विभाग

म्हसळयात गेले दोन- तीन दिवस ढगाळ वातावरण 
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
तालुक्यात गेले दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण आहे.आंबा व काजू बागायतदार हैराण झाले आहेत. बदललेले वातावरण आणि हवामान विभागाने २२ ते २५ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तविल्याने आंबा- काजू बागायतदार पुरते धास्तावले आहेत.बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या दिशेने उष्ण आणि दमट वारे वाहात आहेत. या वाऱ्यामुळेच पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. २२ डिसेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरून येणारे वारे एकत्र येतील ज्यामुळे हा पाऊस पडेल असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदाज वर्तविलाआहे. यामुळे या तीन दिवसांत ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असं सांगण्यात आलं आहे. म्हसळा तालुक्यात आंबा पिकाखाली १८७९ हेक्टर व काजू पिकाखाली ७६९ क्षेत्र आसल्याचे तालुका कृषी अधिकारी डी.डी.अनाप यानी सांगितले.

जाहिरात
"आंबा मोहरण्याचे कालावधीत सतत वातावरणात होणारा बदल, ढगाळ वातावरण, पावसाचा शिडकाव यामुळे आंबा बागायत दारांचे आर्थिक नुकसान होत आहे. महागडी आंतरप्रवाही औषधे, बुरशी नाशके यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे, हवामानातील बदल व पावसाचा शिडकावमुळे फवारणीचे अंतर कमी झाल्याने खर्च वाढले आहेत."
व्यंकटेश सावंत , प्रगतशील बागायतदार लेप- म्हसळा

"ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर करप्याची शक्यता असल्याने (कार्बेन्डॅझिम१२%+मन्कोझेब६३%) १० ग्रॅ प्र १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी."
सुजय कुसाळकर , कृषी पर्यवेक्षक, म्हसळा

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा