म्हसळा (बाबू शिर्के)
दिनांक 8 नोव्हेंबर रोजी माणगाव येथे शिपुरकर स्कुल येथे जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत एस के जी इंटरनॅशनल स्कुलच्या 32 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी आठ विद्यार्थ्यांनी अबॅकस स्पर्धेत यश संपादन केले आहे.यामध्ये सविधान विनयकुमार सोनावणे या विद्यार्थ्याला एक सुवर्ण, आराध्य शशिकांत शिर्के याला एक सुवर्ण, एक सिल्वर, पुष्पक योगेश पाटील, आर्या अरुण जंगम, हर्ष अनिल जाधव, श्रेयश बाळाजी माने, तनिष्का दीपक पाटील, यांना प्रत्येकी सिल्वर तर जैन श्रुती तेजपाल हिला दोन ब्रॉंज मेडल मिळाले.शाळेचे संस्थापक, अध्यक्ष सुरेश कुडेकर, उपाध्यक्ष नरेश विचारे, सचिव श्रीमती एस एस कुडेकर, खजिनदार पाभरेकर, प्राचार्य श्रीमती गजगे मॅडम, तसेच शिक्षक आणी शिक्षकेतर कर्मचारी यांनी यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق