प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रायगड द्वारा क्रीडा सप्ताहांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. बीच गेम्सचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शासनाने क्रीडा सप्ताहांतर्गत विविध बीच गेम्स जिल्ह्यामध्ये आयोजित करण्याचे निर्देशीत केले आहे. त्यानुषंगाने दिवे आगर येथील बीच वर बीच कबड्डी व बीच वुडबॉल या खेळांचे आयोजन दि.१७/१२/२०१९ रोजी करण्यात आले आहे.बीच कबड्डी या खेळासाठी १ जानेवारी २००२ नंतरची जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल तर बीच वुडबॉल खेळाची स्पर्धा खुल्या गटासाठी घेतल्या जातील. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हेमंत पयेर ९८६०६०१७३६, निकेश कोसबे ७२६४०२८१२१, अंकुश गाणेकर 9028878415 यांच्याशी संपर्क करावा.
إرسال تعليق