म्हसळ्यात श्वानदंशाच्या वाढत्या घटना श्वांनाबरोबरच मोकाट गुरांमुळेही म्हसळाकर हैराण ; लक्ष देण्याची मागणी
म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व श्वानांमुळे नागरीक हैराण झाले आहेत . मागील १५ ते २० दिवसात शहरात श्वानदंशाच्या १० ते १५ घटना घडल्या आहेत . त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात व माणगाव येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले . शहरात श्वानांनी दहशत निर्माण केली आहे . श्वानांप्रमाणेच शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांमुळे पादचारी , ज्येष्ठ नागरीक , पदपथावरील व्यावसायिक , भाजी व फळ विक्रेते , वाहतुकदारांना फारच त्रास होत आहे . शहरांत मोकाट गुरांचे प्रमाण वाढत असताना नगरपंचायत प्रशासन काय करीत आहेत , असा सवाल म्हसळ्यातील नागरिक विचारत आहेत . या मोकाट गुरांवर मालकांचे नगरपंचायतीचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही . यामुळे नागरिकांना याचा त्रास होतो . हिंदू बांधव पहाटे काकड आरती , रात्री भजन , तर मुस्लीम बांधव पहाटे व रात्री नमाजासाठी मशिदीत जात असतात . यावेळी उनाड श्वानांचा त्रास होत असतो . दरम्यान , मोकाट गुरे व श्वान हा म्हसळ्यातील प्रश्न गंभीर आहे मासिक सभेपुढे घेण्यात येणार असल्याचे दिपाली मुंडये , प्रशासकीय अधिकारी नगरपंचायत म्हसळा यांनी सांगितले आहे .
दोन वर्षापूर्वी मासिक सभेत उनाड गुरांच्या विषयी चर्चा झाली होती , सर्व अधिकार उ . ए . ज . नगरपंचायत यांना देण्यात आले आहेत .
-नासीर दळवी , माजी उपनगराध्यक्ष म्हसळा
अनेक वेळा शहरांत मोकाट गुरामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ट्रॅफीक पोलिसांना गरे बाजूला करून करावी लागते . गुरे नियंत्रण हा विषय प्राधान्याने नगरपंचायतीचा आहे . वाहतूक पोलीस , म्हसळा .
إرسال تعليق