म्हसळ्यात कडकनाथ कोंबडीची मागणी वाढली : ५०० रुपयांत जोडी.


 म्हसळा प्रतिनिधी

कडकनाथची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. यू-टय़ूब, गुगल तसेच तोंडी प्रचारामुळे मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. महाराष्ट्रातही कडकनाथची प्रचंड मागणी वाढत असताना श्रीवर्धन सायगाव निगडी येथील मलंग शहा या पोल्ट्री व्यवसायीकाने म्हसळा बस स्टँडवर कडकनाथ कोंबडयांची विक्री सुरु केली आहे,कडकनाथ कोंबडयांची नर- मादी केवळ ४५oते ५०० या भावात विकत आहेत.
कडकनाथला भाव मिळतो तोठ
कडकनाथची अनेक चांगल्या जाती आहेत, चंद्रपूर जिल्ह्य़ातील पोंभूर्णा येथील कडकनाथ जम्मू, गुवाहाटी, दिल्ली, पुणे, रत्नागिरी, पंजाब, नेपाळ, लखनौ, बंगळूरु येथे पाठवला जातो. पंचतारांकित हॉटेलमध्येही त्याला मागणी आहे. बाजारात त्याचे दर हजार ते बाराशे रुपये प्रतिकिलो असे आहेत. वेकोलीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१४ मध्ये या व्यवसायात आलेले यशवंत तायडे यांच्याकडे कडकनाथसाठी संपूर्ण भारतातून मागणी आहे. ते ६५० ते ७०० रुपये प्रतिकिलो या घाऊक दराने कडकनाथचा पुरवठा करतात. स्वीडन, फ्रान्स, कुवेत, सौदी, दुबई तसेच इतर मुस्लीमबहुल देशांमध्ये या मांसाची मागणी आहे. तेथे चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो या दराने विक्री केली जाते.
मध्य प्रदेशात मोठय़ा प्रमाणात कोंबडय़ांमध्ये जैवविविधता आढळून येते. येथे काळ्या रंगाच्या मांसाची कोंबडी कडकनाथ किंवा कालामासी या नावाने प्रसिद्ध आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्य़ातील भिल आणि भिलाला आदिवासी जमात कडकनाथचे खूप पूर्वीपासून पालन करीत होते. ‘जेट ब्लॅक’, ‘गोल्डन’ रंगाची ही कोंबडी आदिवासींमध्ये खूपच लोकप्रिय आहे. त्याचे मांस उत्तम आणि चवदार आहे. मध्य प्रदेशने ‘रॉयल चिकन’ म्हणून त्याचा प्रसार केल्यानंतर कडकनाथची लोकप्रियता वाढली आहे.

            Advt


"ग्रामीण लोक कडकनाथचे पालन करतात. कडकनाथचे पालन खुल्या व जंगल भागात पाळल्यास तीची वाढ चांगली होते व ती तेजस्वी दिसते ही कोंबडी पवित्र मानली जाते. दिवाळीच्या दिवशी तिचा देवीसमोर बळी दिला जातो. आदिवासी लोक कडकनाथचे रक्त जुनाट आजाराच्या उपचारासाठी वापरतात. होमिओपॅथिक औषधी गुण आणि मज्जासंस्थेशी संबंधित आजारावर हे मांस गुणकारी आहे"
नंदू पवार, म्हसळा.

"म्हसळ्या सारख्या तालुक्यत कडकनाथ पालनाचा गृह उद्योग, अथवा महिला बचत गटानी पालन करण्याच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी आम्ही माफक दरांत व नर-मादी स्वरुपांत विकत आहोत"
मलंग शहा, सायगाव -निगडी

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा