संजय खांबेटे म्हसळा
ईमानदारी एक जीवनशैली' ही संकल्पना घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) यंदा 'दक्षता जनजागृती सप्ताह' राबवला जात आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दक्षता जनजागृती सप्ताहाचे २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार निर्मूलनाच्या कामात सर्व नागरिकानी सहभागी व्हावे असे आवाहन म्हसळा पोलीस स्टेशनचे पो.नी.अश्वनाथ खेडकर यानी केले. यावेळी किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदू सावंत, कापड व्यापारी संघटनेचे व जैन समाजाचे अध्यक्ष सुरेश शेठ जैन, जब्बारशेट रजपूत, वहातुक व्यवसायीक शकूर शेठ हुरजुक, जितेंद्र चव्हाण, सिताराम काते, जया महामुनकर, अनिल बसवत, जाधव, मुश्ताक हुरजुक, महावीर जैन आदी व्यवसायीक मोठया संखेने उपस्थित होते. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात येते दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ब्युरोची वेबसाईट, ई-मेल, फोन क्रमांक, टोल फ्री क्रमांक इत्यादींची माहिती असणारे स्टिकर शासकीय कार्यालयाच्या आवारात गर्दीच्या ठिकाणी लावून जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येते असे पोलीस निरीक्षक खेडकर यानी सांगितले.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व रायगड पोलीस यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही शासकीय व निमशासकीय कर्मचार्याने सरकारी काम करण्यासाठी लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्या अलिबाग कार्यालयात दूरध्वनी क्र. 02141-222331, टोल फ्री क्र. 1064, मोबा. क्र. 9594613444, 7350750850, 9284989289 लावून तक्रार करावी असे पो.नी. खेडकर यानी सांगितले, यावेळी पोउनी शहबाज शेख , सा.वा.अध्यक्ष संजय खांबेटे यानी मनोगत व्यक्त केले. पो.ना.संतोष चव्हाण, सुर्यकांत जाधव, कैलास होडशिळ यानी जनजागृतीसाठी विशेष मेहनत घेतली.
إرسال تعليق